'बिग बॉस मराठी ६'च्या घरात जाणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या दिपाली सय्यद, शॉर्टकट की मेहनत कोणतं दार निवडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 20:24 IST2026-01-11T20:21:48+5:302026-01-11T20:24:48+5:30
अभिनेत्री आणि राजकीय नेत्या दिपाली सय्यद यांनी 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेऊन सर्वांनाच चकित केलं आहे.

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात जाणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या दिपाली सय्यद, शॉर्टकट की मेहनत कोणतं दार निवडलं?
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी ६' चा आज दिमाखदार सोहळा पार पडत आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक धक्कादायक नाव समोर येत असतानाच, अभिनेत्री आणि राजकीय नेत्या दिपाली सय्यद यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेऊन सर्वांनाच चकित केलं आहे.
चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या दिपाली सय्यद गेल्या काही काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. बेधडक वक्तव्यांमुळे त्या नेहमीच चर्चेत असते. आता 'बिग बॉस'च्या घरात त्यांचा हाच 'बेधडक' अंदाज पाहायला मिळणार आहे. मंचावर एन्ट्री घेताच त्यांनी आपल्या खास शैलीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि होस्ट रितेश देशमुखशी गप्पा मारल्या. मेहनत आणि शॉर्टकट या पैकी त्यांनी शॉर्टकट या दाराची निवड केली. त्यानुसार त्यांना पॉवर की मिळाली आहे.
घरात जाण्यापूर्वी दिपाली सय्यद म्हणाल्या की, "मी घरात समजावून सांगेल. पण, त्यानंतर नाही ऐकलं तर आंदोलन नाहीतर मग आवाज उठवेल". आता दिपाली यांचे घरात इतर स्पर्धकांशी खटके उडणार की त्या सर्वांना आपल्या तालावर नाचवणार, हे पाहणं रंजक ठरेल.