'रंग माझा वेगळा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, दीपाने कार्तिकला घटस्फोट द्यायला दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 14:07 IST2021-12-01T14:07:16+5:302021-12-01T14:07:55+5:30

अखेर दीपा आणि कार्तिक ६ वर्षानंतर समोरासमोर येणार आहेत.

Deepa refuses to divorce Karthik in Rang Maza Vegala Serial | 'रंग माझा वेगळा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, दीपाने कार्तिकला घटस्फोट द्यायला दिला नकार

'रंग माझा वेगळा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, दीपाने कार्तिकला घटस्फोट द्यायला दिला नकार

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळत आहेत. तसेच या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अखेर दीपा आणि कार्तिक ६ वर्षानंतर समोरासमोर येणार आहेत. तेदेखील कोर्टात. 

स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर रंग माझा वेगळाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो शेअर करून लिहिले की, कार्तिकपासून घटस्फोट घेण्यास दीपाने दिला नकार... या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, कोर्टात वकील म्हणतात की मला वाटत नाही दीपा ईनामदार आता कोर्टात हजर राहतील. माझे अशील कार्तिक ईनामदार यांना दीपा ईनामदार यांच्यापासून वन साइड घटस्फोट देण्यात यावा. तितक्यात जज साहेब असा आवाज येतो. तर हा आवाज असतो दीपाचा. ती म्हणते, मला हा घटस्फोट मान्य नाही आहे. त्यामुळे आता पुढे नेमके काय घडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.


रंग माझा वेगळाचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकदेखील पुढील भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नेटकरी सोशल मीडियावर प्रोमोवर कमेंट्स करत आहेत. एका युजरने म्हटले की, वॉव, दीपाची सुपर्ब एन्ट्री. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, दीपाचे आम्हाला चांगले दिवस पाहायचे आहेत. आणखी एका युजरने लिहिले की, हम तुम्हारे साथ है दीपा.

Web Title: Deepa refuses to divorce Karthik in Rang Maza Vegala Serial