'लेक सासरी जाते तेव्हा....', रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 02:54 PM2023-09-04T14:54:33+5:302023-09-04T14:58:49+5:30

या मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची खूप पसंंती मिळाली.आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Deepa got emotional after saying goodbye to the serial rang maza vegla | 'लेक सासरी जाते तेव्हा....', रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक

'लेक सासरी जाते तेव्हा....', रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने कमी कालावधीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची खूप पसंंती मिळाली.आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका निरोप घेणार त्यामुळे दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे भावुक झाली आहे. 

रेश्मा शिंदे हिने इन्स्टाग्रामवर कॅमेऱ्यातील फोटो शेअर करत. भावूक पोस्ट लिहिली आहे, येते हा..जाते नाही, येते म्हणावं नाही का?.. हा निरोप नाही तर पुन्हा नव्या रूपात येण्याची नांदी आहे असं म्हणेन मी..या ना त्या वेगळ्या रूपात तुम्हाला नक्की भेटायला येइन ,अशीच सकारात्मक ऊर्जा घेऊन.. कलर गया तो पैसा वापस..! Thank you star_pravah rajwadesatish monikamrandive shamasayyad माझ्यात विश्वास दाखवल्या बद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल thank u for everything... harshadakhanvilkar aashu.g तुमच्याशिवाय दीपा अपूर्णच..atulketkar aparna.ketkar.1 gchandrakant abhijit_guru thank you माझ्याबरोबर दीपा तुम्ही सुद्धा जगलात.. लेक सासरी जाते तेव्हा तीला लेकिप्रमने तसच प्रेम मया मला दिल्याबद्दल thank you shashishumeetproduction beingnameeta2918 swapnilkarikar ... आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार या प्रवासात हात घट्ट धरून ठेवलात.. असेच आशीर्वाद राहू दे.. येते...

रंग माझा वेगळा मालिका गेली चार वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. हल्लीच या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला होता. आता मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार मंडळींच्या भावुक पोस्ट पाहायला मिळत आहेत.
 

Web Title: Deepa got emotional after saying goodbye to the serial rang maza vegla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.