साध्याभोळ्या मुक्ताचा स्टायलिश अंदाज; रिअल लाइफमध्ये कमालीची ग्लॅमरस आहे नगरकरांची सून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:15 IST2023-11-01T17:15:00+5:302023-11-01T17:15:00+5:30
Saaniya Chaudhari: एका साध्याभोळ्या मुलीची भूमिका साकारणारी सानिया खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे.

साध्याभोळ्या मुक्ताचा स्टायलिश अंदाज; रिअल लाइफमध्ये कमालीची ग्लॅमरस आहे नगरकरांची सून
छोट्या पडद्यावरील अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका म्हणजे दार उघड बये’. जवळपास ३०० भाग पूर्ण केल्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, त्यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये असतात. या मालिकेत अभिनेत्री सानिया चौधरी हिने मुक्ता ही मुख्य भूमिका साकारली होती. एका साध्याभोळ्या मुलीची भूमिका साकारणारी सानिया खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे.
सानिया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते. विशेष म्हणजे तिच्या या पोस्टमधून तिच्या स्टाइल स्टेटमेंटची कायम चाहत्यांना प्रचिती येत असते. यात अलिकडेच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मालिकेत अडाणी वाटणारी मुक्ता रिअल लाइफमध्ये आहे कमालीची बोल्ड; फोटो पाहून व्हाल घायाळ
सानियाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त तिने खास गेटअप केला होता. यात तिने पांढऱ्या रंगाची जीन्स, त्यावर पांढऱ्या-हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि त्याला मॅच होणारं जॅकेट परिधान केलं होतं. या लूकमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत होती. तिचा हा लूक पाहून अनेकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, दार उघड बये दार उघड या मालिकेत सानियाने मुक्ता ही मुख्य भूमिका साकारली होती. तिच्यासोबतच या मालिकेत रोशन विचारे, शरद पोंक्षे, किशोरी आंबिये, भाग्यश्री दळवी ही कलाकार मंडळी झळकले होते.