टीव्हीचा हा प्रसिद्ध सेलिब्रेटी अडकला विवाहबंधनात, मोठ्या थाटात विवाहसोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 14:12 IST2019-01-31T14:05:45+5:302019-01-31T14:12:50+5:30

“दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे”. अशा शब्दांत फिरोज खान यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. 

Dance India Dance Contestant Prince Gupta Wedding, See Photo | टीव्हीचा हा प्रसिद्ध सेलिब्रेटी अडकला विवाहबंधनात, मोठ्या थाटात विवाहसोहळा संपन्न

टीव्हीचा हा प्रसिद्ध सेलिब्रेटी अडकला विवाहबंधनात, मोठ्या थाटात विवाहसोहळा संपन्न

आपल्या जोडीदारासह अनेकांनी जीवनाची नवी इनिंग सुरू केली. नववर्षाची म्हणजेच २०१९ची सुरूवातसुद्धा सनई चौघडेनं झाली आहे. टीव्ही अभिनेत्री शीना बजाज आणि रोहित पुरोहित नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. आगामी काळात टीव्ही अभिनेत्री पलक जैनही विवाहबंधनात अडकणार आहे. आता याच यादीत आणखी एका सेलिब्रेटीचे नाव सामिल झाले आहे. प्रसिध्द डान्सिंग रियालिटी शो 'डान्स इंडिया डान्स'च्याचा एक्स कंटेस्टंट प्रिन्स गुप्तानेही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. गर्लफ्रेंड सोनम लाडियासह तो विवाहबंधनात अडकला आहे. 

या दोघांचे शुभमंगल नुकतंच  गुजरातमध्ये पार पडलं. विशेष म्हणजे प्रिंस आणि सोनमचे गेल्या अनेकवर्षापासून दोघांचे अफेअर सुरू होते. शेवटी त्यांनी आपल्या नात्याला नवी ओळख द्यावी म्हणून लग्न करत नवी इनिंग सुरू केली आहे. या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी कुटुंबासह मित्रमंडळीही उपस्थित होते. सध्या या कपलच्या लग्नाचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दोघांचीही रोमांटीक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये नववधू सोनमचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच पाहायला मिळत आहे. नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.

 

प्रिन्सच्या लग्नात प्रसिध्द कोरियोग्राफर फिरोज खाननेही हजेरी लावली होती. “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे”. अशा शब्दांत फिरोज खान यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. 

Web Title: Dance India Dance Contestant Prince Gupta Wedding, See Photo