Bigg Boss 17च्या घरात होणार दबंग लेडीची एन्ट्री, बऱ्याचदा सर्वांसमोर पतीला केलीय मारहाण, आता शोमध्ये करणार राडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:27 AM2023-11-07T09:27:40+5:302023-11-07T09:28:03+5:30

काही आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या सलमान खानच्या बिग बॉस १७ (Bigg Boss 17) शोमधून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन होत आहे. स्पर्धकांची भांडणे, केमिस्ट्री आणि कपल्समधील भांडण यामुळे हा शो सुरुवातीपासूनच हिट झाला आहे. आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

Dabangg lady will enter the house of Bigg Boss 17, often beat her husband in front of everyone | Bigg Boss 17च्या घरात होणार दबंग लेडीची एन्ट्री, बऱ्याचदा सर्वांसमोर पतीला केलीय मारहाण, आता शोमध्ये करणार राडे

Bigg Boss 17च्या घरात होणार दबंग लेडीची एन्ट्री, बऱ्याचदा सर्वांसमोर पतीला केलीय मारहाण, आता शोमध्ये करणार राडे

बिग बॉस १७ (Bigg Boss 17)ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. टीआरपीच्या यादीतही या टीव्ही शोने इतर मालिकांना मागे टाकत बाजी मारली आहे. काही आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या सलमान खानच्या या शोमधून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन होत आहे. स्पर्धकांची भांडणे, केमिस्ट्री आणि कपल्समधील भांडण यामुळे हा शो सुरुवातीपासूनच हिट झाला आहे. आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. अलीकडेच, समर्थ जुरेल आणि मनस्वी ममगाई यांनी वाईल्ड कार्डद्वारे घरात प्रवेश केला. परंतु काही आठवड्यांनंतर, मनस्वीला शोमधून बाहेर काढण्यात आले, तर समर्थचा लव्ह ट्रायंगल त्याला सुरक्षित ठेवत आहे. आता समजत आहे की निर्माते आणखी दोन वाइल्ड कार्ड एंट्रीसह घराचे संपूर्ण वातावरण बदलण्याचा विचार करत आहेत. यासाठी दोन नावांची सर्वाधिक चर्चा होत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस १७च्या घरात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. 'तहलका प्रँक' यूट्यूबर सनी आर्याची पत्नी दीपिका आर्या या शोमध्ये प्रवेश करू शकते. असं झालं तर सिंगल स्पर्धक म्हणून घराघरात धुमाकूळ घालणाऱ्या सनी आर्याचंही नाव कपल लिस्टमध्ये येईल. यानंतर शोचे संपूर्ण वातावरण बदलू शकते.

वाइल्ड कार्ड एंट्रीचे दुसरं नाव
आणखी एक स्पर्धक ज्याचे नाव वाईल्ड कार्डद्वारे समोर येत आहे ते म्हणजे राघव शर्मा, जो एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान सारख्या युट्युबर्ससोबत व्हिडीओ बनवतो. राघव लवकरच 'बिग बॉस १७' मध्ये येऊ शकतो. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून या दोन स्पर्धकांची नावे शोच्या मनोरंजनाला आणखी उंचीवर नेऊ शकतात.

बिग बॉसच्या घराचा 'गेम प्लॅन'
बिग बॉस १७ हा शो सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. या शोच्या ताज्या अपडेट्समध्ये मनस्वी ममगाई शोमधून बाहेर असल्याची माहिती मिळत आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा तू तू-मैं मैं ड्रामा सुरूच आहे. रविवारचा वीकेंड वॉर एपिसोड खूपच जबरदस्त होता. अभिषेकला त्याच्याच घरातून हाकलून देण्यात आले आहे, तर मुनव्वरचा शानदार खेळ पाहायला मिळत आहे.

Web Title: Dabangg lady will enter the house of Bigg Boss 17, often beat her husband in front of everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.