'पप्पा तुम्ही म्हणाले होते की फोटो..'; कपिल शर्माच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 11:47 IST2024-05-22T11:46:31+5:302024-05-22T11:47:35+5:30

कॉमेडियन कपिल शर्माची लेक अनायराने पापाराझींसमोर बाबाची गोड तक्रार केली. हा व्हिडीओ चांगलाच व्हिडीओ व्हायरल झालाय (kapil sharma)

Cute video of Kapil Sharma daughter anayra sharma viral at mumbai airport | 'पप्पा तुम्ही म्हणाले होते की फोटो..'; कपिल शर्माच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

'पप्पा तुम्ही म्हणाले होते की फोटो..'; कपिल शर्माच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा सध्या नेटफ्लिक्सवर चांगला चर्चेत असलेला शो आहे. कपिल शर्मा या शोच्या माध्यमातून विविध सेलिब्रिटींसोबत लोकांना खळखळून हसवण्याचं काम करतोय. कपिल शर्मा ऑफ कॅमेरा सुद्धा पापाराझींसोबत धमाल करताना दिसतो. अशातच कपिलची लेक अनायराचा क्यूट व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. यात छोट्या अनायराने सर्वांसमोर बाबाची तक्रार केलीय.

अनायराने सर्वांसमोर केली कपिलची तक्रार

व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळतं की..  कपिल शर्मा बाहेरगावी जाण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. त्यावेळी त्याची लेक अनायराने कपिलच्या पत्नीचा हात पकडला होता. तर कपिलने मुलाला कडेवर घेतलं होतं. कपिल एअरपोर्टवर येताच पापाराझींनी त्याला फोटोसाठी घेरलं. हे पाहताच छोटी अनायरा नाराज झाली. ती सर्वांसमोर कपिलला म्हणाली, "पप्पा तुम्ही बोलले होते ना फोटो क्लिक नाही करणार म्हणून!" अनायराची गोड तक्रार ऐकताच कपिलसह उपस्थित पापाराझीही खळखळून हसायला लागले.

कपिल शर्माचं कुटुंब आणि वर्कफ्रंट

कपिल शर्माने काही वर्षांपुर्वी त्याची पार्टनर गिन्नीसोबत पंजाबी रितीरिवाजांमध्ये विवाह केला. २०१९ ला त्यांची मुलगी अनायराचा जन्म झाला. पुढे दोन वर्षांनी अर्थात २०२१ ला त्यांनी मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव त्रिशान ठेवलं. कपिल आणि गिन्नी अनेकदा पार्टी इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात. सध्या कपिल शर्मा होस्ट करत असलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा कार्यक्रम नेटफ्लिक्सवर चांगलाच चर्चेत आहे.

Web Title: Cute video of Kapil Sharma daughter anayra sharma viral at mumbai airport