अनिरुद्ध-संजनाच्या लग्नाची उत्सुकता वाढली, संजनाचा लग्नातील लूक होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 12:10 IST2021-08-26T12:09:34+5:302021-08-26T12:10:11+5:30

आई कुठे काय करते ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

Curiosity about Aniruddha-Sanjana's marriage increased, Sanjana's wedding look is going viral | अनिरुद्ध-संजनाच्या लग्नाची उत्सुकता वाढली, संजनाचा लग्नातील लूक होतोय व्हायरल

अनिरुद्ध-संजनाच्या लग्नाची उत्सुकता वाढली, संजनाचा लग्नातील लूक होतोय व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते कमी कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर संजनाला लग्नाचे वेध लागले. गेली कित्येक वर्षे ती ज्या दिवसाची वाट पहात होती तो दिवस आता जवळ आला आहे. ३० ऑगस्ट ही या दोघांच्या लग्नाची तारीख पक्की झाली आहे. 

अनिरुद्धसोबत लगीनगाठ बांधून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे. लग्नामध्ये संजना नटण्याची सर्व हौस भागवून घेणार आहे. गुलाबी रंगाच्या साडीतला तिचा ब्रायडल लूक सध्या व्हायरल होतो आहे.


आई कुठे काय करते मालिकेतल्या संजनाच्या लूकची नेहमीच चर्चा राहिली आहे. संजनाचे स्टाइल स्टेटमेण्ट तिचे चाहते फॉलो करताना दिसतात. संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेला देखील फॅशनचे नवनवे ट्रेण्ड ट्राय करायला खूप आवडतात. त्यामुळे अनिरुद्धसोबतच्या लग्नासाठी तिने खास तयारी केली आहे.

गुलाबी रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे. अनिरुद्धच्या नावाची मेहेंदीही तिच्या हातावर सजली आहे. आता या दोघांचे लग्न पार पडणार की इथेही नवा ट्विस्ट येणार हे मालिकेच्या पुढील भागात कळेल. 

Web Title: Curiosity about Aniruddha-Sanjana's marriage increased, Sanjana's wedding look is going viral