कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरी यांच्यात झाली भांडणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 17:29 IST2017-08-03T11:32:28+5:302017-08-03T17:29:09+5:30
कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरी हे एकेकाळचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांनी कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात एकत्र काम केले ...

कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरी यांच्यात झाली भांडणं
क ष्णा अभिषेक आणि सुदेश लहरी हे एकेकाळचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांनी कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात एकत्र काम केले होते. त्यांच्या जोडीचे सगळे कौतुक करत असत. त्यांनी या कार्यक्रमानंतर देखील कॉमेडी नाईट्स बचाओमध्ये देखील एकत्र काम केले होते. त्यांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा केली जाते. ते सध्या दोघे ड्रामा कंपनीमध्ये झळकत आहेत. कृष्णा आणि सुदेश हे दोघेही खूपच चांगले कॉमेडीयन आहेत. त्यांच्या कॉमेडीचे अनेक चाहते आहेत. ते दोघे एकत्र असल्यास ते खूपच धमाल मस्ती करतात. त्या दोघांची ट्युनिंग देखील खूप चांगली आहे. पण आता त्या दोघांमध्ये भांडणं झाली असून ते एकमेकांशी बोलत देखील नसल्याचे कळतेय.
ड्रामा कंपनीत कृष्णा आणि सुदेश एकत्र काम करत असले तरी ते मालिकेच्या सेटवर एकमेकांशी अजिबातच बोलत नसल्याचे कळतंय. कपिल आणि सुदेश हे दोघेही खूपच चांगले कलाकार आहेत. त्यांनी दोघांनीही चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. कॉमेडीच्या जगतात त्या दोघांनीदेखील आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण द ड्रामा कंपनीमध्ये कृष्णामुळे इतर कलाकारांना स्कोप मिळत नसल्याचे सुदेशचे म्हणणे आहे आणि त्याचमुळे त्या दोघांमध्ये वादविवाद निर्माण झाले आहेत. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील त्यांच्यातील वाद सगळ्यांच्या लक्षात आला होता. कारण कृष्णा हा स्टार आहे, आम्ही तर त्याच्या हातातील कळसूत्रीच्या बाहुल्या आहोत असा सुदेश म्हणाला होता. त्यानंतर सुदेशने कृष्णासोबत बोलणेच बंद केले आहे. एवढेच नव्हे तर सुदेश कृष्णाचा फोन देखील उचलत नसल्याचे कळतेय. याविषयी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा अभिषेकने सांगितले आहे की, आमच्या दोघांमध्ये एकेकाळी खूप चांगली मैत्री होती. आम्ही अनेकवेळा वैयक्तिक गोष्टी देखील शेअर करत होतो. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. सुदेश माझ्याशी बोलत नसल्याने मला प्रत्येक गोष्ट त्याच्या मॅनेजरसोबत बोलावी लागते. आमच्यात काही समस्या निर्माण झाल्या आहेत. पण आम्ही दोघे मिळून त्यावर लवकरच तोडगा काढू असे मला वाटते. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाच्या वेळी मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. तो एक खूपच चांगला कलाकार आहे.
Also Read : कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह बनले माता-पिता