Bigg Boss Marathi 2 : आणि घरात सदस्यांना का झाले हसू अनावर, सविस्तर वाचा 'हा' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 04:58 PM2019-07-31T16:58:56+5:302019-07-31T17:14:46+5:30

बिग बॉस मराठीमध्ये अभिजीत बिचुकले परतल्याने घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण असते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे काहीतरी म्हणणे असते, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असते.

Contestant cant stop laughing in bigg boss marathi house | Bigg Boss Marathi 2 : आणि घरात सदस्यांना का झाले हसू अनावर, सविस्तर वाचा 'हा' किस्सा

Bigg Boss Marathi 2 : आणि घरात सदस्यांना का झाले हसू अनावर, सविस्तर वाचा 'हा' किस्सा

googlenewsNext

बिग बॉस मराठीमध्येअभिजीत बिचुकले परतल्याने घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण असते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे काहीतरी म्हणणे असते, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असते. अभिजीत बिचुकले स्वत:ला रिअ‍ॅलिटी किंग समजतो.  त्याचे नेहेमीच म्हणणे असते One And Only अभिजीत बिचुकले. बिचुकलेंची घरामध्ये सुरू असलेली धम्माल मस्ती बघण्याजोगी असते. आज घरामध्ये सुरू असलेल्या कार्यात देखील बिचुकले यांनी गंमत आणली आहे. या कार्यानुसार बिग बॉस कधीही कोणत्याही सदस्याला स्टॅच्यू आणि रिलीझची सूचना देऊ शकतात आणि यामुळेच बिचुकले जरा अवघड परिस्थितीत अडकले आहेत.

 नेहा, शिवानी, बिचुकले, रूपाली आणि आरोह बसले असताना बिचुकले बिग बॉसना विनंती करताना दिसणार आहेत. बिग बॉस कधीही स्टॅच्यू सांगू शकतात त्यामुळे बिचुकले त्यांना सांगत आहेत “मी बाथरूम”ला जाणार आहे कृपया मला जाऊ द्या. त्यावर नेहाचे म्हणणे आहे त्याबद्द्ल प्रस्तावना न देता जाऊन या... पण, बिग बॉस यांनी मात्र बिचुकलेना टी शर्ट बदलताना स्टॅच्यू  केले. हे बघून घरामध्ये एकच कल्ला झाला आणि सगळ्याना हसू फुटले. घरातील सदस्यांचे म्हणणे पडले तुम्ही दरवेळा हेच करता म्हणून तुम्हाला स्टॅच्यू केले.  बाथरूममध्ये  जाऊन बदलायचे कपडे..  हे बोलतानाच सदस्यांना हसू अनावर झाले.

Web Title: Contestant cant stop laughing in bigg boss marathi house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.