'बिग बॉस'मधील ही स्पर्धक बनली पॉर्नस्टार, केली आगामी प्रोजेक्टची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 09:34 PM2021-03-11T21:34:45+5:302021-03-11T21:35:17+5:30

पॉर्नस्टारची भूमिका ऐकून तिच्या कुटुंबीयांनी तिला काम करण्यास परवानगी दिली नव्हती.

The contestant in 'Bigg Boss' became a pornstar, Kelly announced her upcoming project | 'बिग बॉस'मधील ही स्पर्धक बनली पॉर्नस्टार, केली आगामी प्रोजेक्टची घोषणा

'बिग बॉस'मधील ही स्पर्धक बनली पॉर्नस्टार, केली आगामी प्रोजेक्टची घोषणा

googlenewsNext

बिग बॉस १०चा स्पर्धक लोकेश शर्मा आता सेलिब्रेटी बनली आहे. बिग बॉसमध्ये कॉमन मॅन म्हणून एन्ट्री करणारी लोकेश आता झगमगत्या दुनियेत पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. लोकेश शर्मा पॉर्न स्टारची भूमिका साकारताना दिसणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसमध्ये आजवर अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. लोकेश शर्मा ही देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. ती बिग बॉसच्या १०व्या सीझनमध्ये झळकली होती. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

विशेष बाब म्हणजे लोकेश  पहिल्याच चित्रपटात चक्क एका पॉर्नस्टारची भूमिका साकारणार आहे. Myakut: The Sheep असे तिच्या या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. 


लोकेशने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, बालपणापासूनच मी ग्लॅमरस व्यक्तिरेखा साकारण्याची स्वप्न पाहायचे. अन् या चित्रपटाने माझे ते स्वप्न पूर्ण केले. या चित्रपटासाठी मला खूप तयारी करावी लागली. रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस दिसण्यासाठी मी जिममध्ये तासंतास व्यायाम करायचे. व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी मी काही पॉर्न चित्रपट देखील पाहिले. शिवाय अभिनय कौशल्य सुधारण्यासाठी मी काही काळ रंगभूमीवर देखील काम केले.


पॉर्नस्टारची भूमिका ऐकून तिच्या कुटुंबीयांनी तिला चित्रपटात काम करण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र तिने आपल्या कुटुंबाला समजावल्यानंतर त्यांनी परवानगी दिली.
या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रुफी खान मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट लवकर अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The contestant in 'Bigg Boss' became a pornstar, Kelly announced her upcoming project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.