कर्जबाजारी झालेल्या ‘या’ कॉमेडियनला मिळेना काम, नाइलाजास्तव मुलीच्या घरी घेतला आश्रय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 03:54 PM2017-11-17T15:54:06+5:302017-11-17T21:24:06+5:30

एकेकाळचे प्रसिद्ध लेखक आणि कॉमेडियन लिलिपुट सध्या काम मिळविण्यासाठी दारोदार फिरत आहेत. प्रचंड कर्जबाजारी झाल्याने त्यांना नाइलाजास्तव मोठ्या मुलीकडे ...

'Comedians' found work to meet the debt-laden people, took shelter at a girl's house! | कर्जबाजारी झालेल्या ‘या’ कॉमेडियनला मिळेना काम, नाइलाजास्तव मुलीच्या घरी घेतला आश्रय!

कर्जबाजारी झालेल्या ‘या’ कॉमेडियनला मिळेना काम, नाइलाजास्तव मुलीच्या घरी घेतला आश्रय!

googlenewsNext
ेकाळचे प्रसिद्ध लेखक आणि कॉमेडियन लिलिपुट सध्या काम मिळविण्यासाठी दारोदार फिरत आहेत. प्रचंड कर्जबाजारी झाल्याने त्यांना नाइलाजास्तव मोठ्या मुलीकडे राहावे लागत आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबतचा खुलासा स्वत: लिलिपुट यांनी केला आहे. लिलिपुट यांचे खरे नाव एम. एम. फारूखी असून, ९०च्या दशकातील ‘देख भाई देख’ या लोकप्रिय कॉमेडी शोचे ते लेखक आहेत. या शोमुळेच त्यांना खºया अर्थाने ओळख मिळाली आहे. 



लिलिपुटच्या मते, गेले पाच वर्षे त्यांच्यासाठी खूपच भयावह असे गेले आहेत. ते कर्जबाजारी झाले असून, कामाच्या शोधासाठी ते दारोदार फिरत आहेत. लिलिपुटने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून मी दोन स्क्रिप्ट्स घेऊन निर्मात्यांच्या आॅफिसच्या पायºया झिजवित आहे. मात्र त्यांच्याकडून बघूया-विचार करूया असेच उत्तर मिळत आहेत, तर काही असेही टोमणे मारत आहेत की, हल्ली बुटके लोकही दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न घेऊन फिरत आहेत. लिलिपुट यांनी या चर्चेत १९९८ मध्ये ‘वो’ या टीव्ही सीरीजमध्ये त्यांनी केलेल्या नॉन कॉमिक भूमिकेचीही आठवण करून दिली. 



स्टीफेन किंग यांच्या एका हॉरर कांदबरीवर आधारित या सीरीजमध्ये जेव्हा त्यांनी काम केले तेव्हा एका टॉप स्टारने (लिलिपुट यांनी नाव सांगितले नाही) म्हटले होते की, ‘तर तुम्ही गंभीर भूमिकाही साकारू शकता. मी तर विचार करीत होतो की, बुटके लोक केवळ कॉमेडी करतात.’ तर आणखी एका उच्चशिक्षित अभिनेत्याने जोक मारताना म्हटले होते की, लिलिपुटचा पेजर नंबर त्याच्यापेक्षा अधिक उंच आहे.’ पुढे बोलताना लिलिपुटने म्हटले की, डिसेंबर १९७५ मध्ये जेव्हा मी मुंबईला आलो होतो, तेव्हा मी पहिला बुटका अभिनेता होतो. तेव्हाच मी ठरविले होते की, स्वत:चा ब्रॅण्ड तयार करणार. मी तेव्हा विचार केला होता की, बॉलिवूडसारख्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये मला खूप चांगले आणि मजेदार रोल मिळतील. त्यामुळे मी माझे नाव लिलिपुट असे ठेवले.’



दरम्यान, सध्या लिलिपुट कामाच्या शोधात असून, ते निर्मात्यांकडे सातत्याने चकरा मारत आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांना यश मिळाले नाही. परंतु अशातही त्यांनी हार मानली नसून, अजूनही ते त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवत आहेत. 

Web Title: 'Comedians' found work to meet the debt-laden people, took shelter at a girl's house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.