कॉमेडीयन कपिल शर्माच्या सिनेमात झळकणार बालकलाकार दमनप्रित सिंह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 19:20 IST2017-03-08T13:50:26+5:302017-03-08T19:20:26+5:30

शेर -ए- पंजाब महाराज रणजित सिंग मालिकेतला बालकलाकार दमनप्रित सिंह सध्या एका कपिल शर्माच्याही पंजाबी सिनेमात काम करतोय. त्यामुळे ...

Comedian Babilak Daman Pratap Singh to be seen in Kapil Sharma's movie? | कॉमेडीयन कपिल शर्माच्या सिनेमात झळकणार बालकलाकार दमनप्रित सिंह?

कॉमेडीयन कपिल शर्माच्या सिनेमात झळकणार बालकलाकार दमनप्रित सिंह?

र -ए- पंजाब महाराज रणजित सिंग मालिकेतला बालकलाकार दमनप्रित सिंह सध्या एका कपिल शर्माच्याही पंजाबी सिनेमात काम करतोय. त्यामुळे एकीकडे सिनेमाचे शूटिंग आणि मालिकेचे शूटिंगमुळे त्याची खूप तारांबळ उडत असल्याचे पाहायला मिळाले.आपल्या वेळा शूटिंगसाठी योग्यरितीने मॅनेज करत तो आपले काम उत्कृष्ठ कसे होईल याकडे आपले लक्ष केंद्रित करत आहे.नुकतेच त्याने मालिकेच्या शूटमधून ब्रेक घेत दोन दिवस चंदीगडला जावून सिनेमाचे शूटिंग संपवून आला आहे. आता सिनेमाचे काम पूर्ण झाल्यामुळे तो थोडा निवांत झाला असल्याचे दमनप्रित सांगतो.मुळात मालिकेत काम करत असतानाच त्याला सिनेमाची ऑफर मिळाली होती.त्यामुळे शेर-ए-पंजाब मालिकेच्या कामात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येऊ देता तो आपले काम करत राहिला आहे.जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यामुळेच मी एकाचवेळी मालिका आणि सिनेमाचे शूटिंग करू शकलो असेही त्याने सांगितले.

Web Title: Comedian Babilak Daman Pratap Singh to be seen in Kapil Sharma's movie?