अज्याला गुडलक देणारी, स्वतः अभ्यासात ‘ढ’ असणारी शीतली रिअलमध्ये तितकीच हुश्शार आणि फाडफाड बोलते ही परदेशी भाषा, जाणून घ्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 04:54 AM2017-10-17T04:54:05+5:302017-10-17T10:24:05+5:30

छोट्या पडद्यावरील लागीर झालं जी ही मालिका रसिकांना भावते आहे. या मालिकेची लोकप्रियता नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यातही ...

In the cold realm of 'Dha', in the study itself, as well as the person who speaks the language, the foreign language speaks as much cleverness and flute. | अज्याला गुडलक देणारी, स्वतः अभ्यासात ‘ढ’ असणारी शीतली रिअलमध्ये तितकीच हुश्शार आणि फाडफाड बोलते ही परदेशी भाषा, जाणून घ्या !

अज्याला गुडलक देणारी, स्वतः अभ्यासात ‘ढ’ असणारी शीतली रिअलमध्ये तितकीच हुश्शार आणि फाडफाड बोलते ही परदेशी भाषा, जाणून घ्या !

googlenewsNext

/>छोट्या पडद्यावरील लागीर झालं जी ही मालिका रसिकांना भावते आहे. या मालिकेची लोकप्रियता नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळाली. या सोहळ्यातील बहुतांशी पुरस्कार पटकावून लागीर झालं जी या मालिकेनं पटकावली. त्यामुळे रसिकांना ही मालिका, मालिकेची कथा आणि मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा किती भावते यावर जणू शिक्कामोर्तबच झालं. अजिंक्य नावाचा तरुण फौजी बनण्यासाठी कशी धडपड करतो असं कथानक असलेली मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत चालली आहे. या मालिकेत अजिंक्यच्या फौजी बनण्यासाठीची धडपड, त्याची प्रेमकहानी आणि त्याच्या मार्गात येणारे अडथळे मोठ्या खुबीने रंगवण्यात आले आहेत. अजिंक्यसोबतच या मालिकेतील शीतल, राहुल्या, जयडी, भैय्या, टॅलेंट अशी प्रत्येक पात्रं रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहेत. यातील अजिंक्यला गुडलक देणारी शीतल रसिकांना चांगलीच भावतेय. मालिकेत अजिंक्य अर्थात अज्यासोबत तिची प्रेमकहानी आता बहरु लागली आहे. बोलण्यात पटाईत, तितकीच तेज आणि समोरच्या व्यक्तीची बोलती बंद करणारी शीतल रसिकांना भावते. अजिंक्यला फौजी बनण्यासाठी गुडलक देणारी शीतल स्वतः अभ्यासात मात्र ढ असल्याचे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. अभ्यासाचा तिला कंटाळा येतो आणि ती काही विषयांत नापासही झाल्याचे मालिकेत दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री शिवानी बावकर हिने मोठ्या खुबीने शीतली ही भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयामुळेच गुडलक देणारी शीतल रसिकांच्या काळजात घर करुन गेली आहे. गुडलक देणारी ऑनस्क्रीन शीतल अभ्यासात ढ असली तरी रिअल शीतल म्हणजेच शिवानी बावकर मात्र अभ्यासात भलतीच हुशार आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना जर्मन भाषा ऑप्शनल म्हणून निवडली होती. ती शिकत असताना शिवानीने ती चटकन आत्मसात केली. शिकताना जर्मन भाषेबाबत आवड निर्माण झाली. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याच्या विविध लेव्हल्स तिने पार केल्या. त्यामुळेच मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच शिवानी जर्मन भाषाही तितक्याच फाडफाडपमे आणि बिनधास्तपणे बोलू शकते. जर्मन भाषा शिकण्याचा फायदा तिला नोकरी मिळवण्यातही झाला. त्यामुळे शीतली साकारण्याआधी तिने एका आयटी कंपनीत जर्मन ट्रान्सलेटर म्हणून कामही केलं होतं. त्यामुळे लागीर झालं जीची शीतली ऑनस्क्रीन ढ असली तरी रिअलमध्ये ती तितकीच हुश्शार आहे.  

Web Title: In the cold realm of 'Dha', in the study itself, as well as the person who speaks the language, the foreign language speaks as much cleverness and flute.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.