अचानक कुठे गेला CID तील विवेक, इतक्या वर्षांनंतर सोशल मीडियावर का होतीये चर्चा? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 07:52 PM2023-06-22T19:52:46+5:302023-06-22T19:53:43+5:30

CID Fame Vivek Mashru: तुम्ही CID शो पाहिला असेल, तर यातील विवेक तुम्हाला नक्कीच आठवत असेल. पाहा आज तो काय करतोय...

CID Fame Vivek Mashru: Where is Vivek Mashru from CID, why is it being discussed on social media after so many years? see | अचानक कुठे गेला CID तील विवेक, इतक्या वर्षांनंतर सोशल मीडियावर का होतीये चर्चा? पाहा...

अचानक कुठे गेला CID तील विवेक, इतक्या वर्षांनंतर सोशल मीडियावर का होतीये चर्चा? पाहा...

googlenewsNext

CID Fame Vivek Mashru: टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका CID सर्वांच्याच परिचयाची आहे. CID शोने जवळपास 21 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हा शो लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सर्वांच्या आवडीचा होता. 21 वर्षे चालल्यानंतर हा शो 27 ऑक्टोबर 2018 रोजी बंद करण्यात आला. शोच्या 21 वर्षांमध्ये अनेक स्टार्स कास्ट बदलण्यात आल्या. अभिनेता विवेक मश्रू त्यापैकीच एक होता. पण, आता अनेक वर्षांनंतर विवेक पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अनेक वर्षांनी दिलसा CID चा विवेक 

महिन्याभरापूर्वी म्हणजेच 21 मे रोजी ट्विटरवर विवेक मश्रूचा फोटो शेअर करण्यात आला होता. त्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते, "जर तुम्ही याला ओळखत असाल तर तुमचे बालपण अप्रतिम गेले आहे." आता एका महिन्यानंतर म्हणजेच 21 जून रोजी विवेकने ही पोस्ट रिट्विट केली आणि लिहिले, "मी माझ्या आयुष्यात जे काम केले, त्याबद्दल म्ही दिलेले प्रेम आणि कौतुक पाहून खूप आनंद झाला. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे." 

पोस्ट व्हायरल...

विवेकच्या पोस्टनंतर अनेकांनी त्याचा फोटो शेअर केला आणि त्याच्या आठवणी शेअर केल्या. एका चाहत्याने लिहिले, आजकाल तू कुठे आहेस. तर दुसर्‍याने लिहिले की, ASUR सीझन 3 मध्ये रसूलच्या जागी विवेकने OTT डेब्यू करावा. त्याला आधीच सीआयडीचा अनुभव आहे. तिसर्‍याने लिहिले, आम्ही तुमचे आभार मानायला हवे, कारण तुम्ही आमचे बालपण संस्मरणीय केले आहे. 

विवेक सध्या कुठे आहे?

ट्विटरवरच मोनिका शर्मा नावाच्या तरुणीने त्याचा फोटो शेअर करत सांगितले की, विवेक आता कॉलेजमध्ये प्राध्यापक झाला आहे. तर, आणखी एका युजरने लिहिले, मी विवेकची लिंक्डइन प्रोफाईल पाहिली, त्याने टेक्सास विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे आणि तो आता बंगळुरूत प्राध्यापक झालाय. दरम्यान, आम्हीदेखील त्याची प्रोफाईल चेक केली असता, तो सध्या प्राध्यापक झाल्याचे दिसत आहे.

'अक्कड बक्कड बम्बे बो'मधून कामाची सुरुवात
विवेक मश्रूने अक्कड बक्कड बॉम्बे बो या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. याशिवाय सीआयडी या शोमध्ये तो विवेकच्या भूमिकेत दिसला होता. 2006 मध्ये या शोमध्ये तो सामील झाला. या शोमध्ये त्याने जवळपास 6 वर्षे काम केले. 2012 मध्ये त्याने या शोला अलविदा केला. 2014 मध्ये त्याचे लग्न झाले. विवेक इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तो त्याच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असतो.

Web Title: CID Fame Vivek Mashru: Where is Vivek Mashru from CID, why is it being discussed on social media after so many years? see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.