17 वर्षांचा संसार मोडला! ‘CID’च्या या अभिनेत्यानं आत्तापर्यंत लपवून ठेवलं होतं घटस्फोटाचं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 16:38 IST2021-05-19T16:35:49+5:302021-05-19T16:38:55+5:30
आत्तापर्यंत त्याने घटस्फोटाची बातमी जगापासून लपवून ठेवली होती. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत तो पहिल्यांदाच यावर बोलला.

17 वर्षांचा संसार मोडला! ‘CID’च्या या अभिनेत्यानं आत्तापर्यंत लपवून ठेवलं होतं घटस्फोटाचं दु:ख
ग्लॅमर जगतात लग्न आणि घटस्फोट नवे नाही. आता छोट्या पडद्यावरच्या आणखी एका अभिनेत्याचा घटस्फोट झाला आहे. त्याचे नाव हृषीकेश पांडे (Hrishikesh Pandey). ‘सीआयडी’ (CID )या मालिकेत हृषीकेशला तुम्ही पाहिले असेल.
या घटस्फोटासोबत हृषीकेशचे 17 वर्षांचे वैवाहिक आयुष्य कायदेशीररित्या सुपंष्टात आले आहे. आत्तापर्यंत हृषीकेशने घटस्फोटाची बातमी जगापासून लपवून ठेवली होती. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत तो पहिल्यांदाच यावर बोलला.
‘नवभारत टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने घटस्फोट झाल्याचे सांगितले.
2004 साली ऋषीकेशचे त्रिशा दुभाष हिच्याशी लग्न झाले होते. पण काही वर्षातच त्यांच्यात वाद सुरु झाले. यानंतर 2014 पासून दोघेही विभक्त झाले होते. पुढे त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. काही कारणांमुळे ही प्रकिया लांबली आणि तब्बल सात वर्षांनी म्हणजेच यावर्षी त्यांना घटस्फोट मंजूर झाला.
हृषीकेश व त्रिशा यांना 12 वर्षाचा मुलगा आहे़ आईबाबा वेगळे झालेत तेव्हा तो केवळ 5 वर्षांचा होता. त्याची कस्टडी हृषीकेशला मिळाली आहे.
म्हणून लपवली घटस्फोटाची बातमी
हृषीकेशने जाणीवपूर्वक इतक्या वर्षे संसारातील कुरबुरी जगापासून लपवून ठेवल्या होत्या. घटस्फोटाची बातमीही त्याने कुणाला कळू दिली नव्हती. यामागचे कारण होते मुलाचे. मुलगा लहान होता. आई-बाबांच्या घटस्फोटाच्या बातम्या आणि त्याच्या चर्चांचा त्याच्या मनावर वाईट परिणाम होऊ नये, यासाठी हृषीकेशने जगापासून सगळं काही लपवलं. आता मात्र मुलगा दक्ष मोठा झाला असून आता त्याला गोष्टी कळतात. तर, आता कायदेशीरपपणे घटस्फोट झाल्याने समोर येऊन बोलत असल्याचे हृषीकेशने सांगितले.
तो म्हणाला, आम्ही विभक्त झालो होतो. पण सगळं काही सुरळीत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. मुलासाठी हे करणे भाग होते. त्या काळात मी दिवस-दिवस शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे दक्षला हॉस्टेलवर ठेवावे लागले. त्यावेळी त्याच्या शाळेतील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी काम संपवून रात्रभर ड्रायव्हिंग करून मी त्याच्या शाळेत जात होतो, पण आता दक्ष थोडा मोठा झाल्याने माझ्या कामाचे स्वरूप त्याला समजू शकते. त्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत.
हृषीकेशने ‘सीआयडी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. ये रिश्ता क्या कहलाता है, जग जननी मां वैष्णोदेवी अशा अनेक मालिकांमध्येही काम केले आहे.