बाssई! छोट्या पुढारीने निक्कीसोबत केलं फ्लर्ट, मग मिळाली गालावर पप्पी; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 16:54 IST2024-08-08T16:51:47+5:302024-08-08T16:54:47+5:30

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील छोटा पुढारी आणि निक्की तांबोळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय (bigg boss marathi 5)

chota pudhari ghanashyam darode flirt with nikki tamboli in bigg boss marathi 5 | बाssई! छोट्या पुढारीने निक्कीसोबत केलं फ्लर्ट, मग मिळाली गालावर पप्पी; Video व्हायरल

बाssई! छोट्या पुढारीने निक्कीसोबत केलं फ्लर्ट, मग मिळाली गालावर पप्पी; Video व्हायरल

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चर्चा जोरात आहे. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक दररोज रात्री ९ वाजता बिग बॉस मराठीचा नवीन सीझन बघण्यासाठी आतुर असतात. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये प्रेमाचे वारे वाहत असल्याचं दिसतंय. इरिना-वैभव चव्हाण, निक्की-अरबाज या जोडींमध्ये प्रेम फुलत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. यात छोटा पुढारी घनःश्याम दरोडे निक्की तांबोळीशी फ्लर्ट करताना दिसतोय. 

निक्कीने छोटा पुढारीला दिली पप्पी

घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणाऱ्या या पुढाऱ्याने घरातील सर्व सदस्यांनाही आपलंस केलं आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घन:श्याम इरिनाला म्हणतोय,"तू माझ्याशी कसंही वाग...पण मी तुझ्यासोबत प्रेमानेच वागणार". पुढे तो निक्कीशीही फ्लर्ट करताना दिसत असून निक्कीने घनःश्यामला मिठी मारली. याशिवाय त्याच्या गालावर पप्पी दिली. यामुळे छोटा पुढारी चांगलाच लाजलेला दिसला.


घनःश्याम सर्व परफॉर्मन्सचं करणार परिक्षण

'बिग बॉस मराठी'च्या घरात आज टीव्ही टास्क पार पडणार आहे. बिग बॉस टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसत आहेत. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. आता कोणाचे परफॉर्मन्स लय भारी असणार. याशिवाय घनःश्याम सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण कसं करणार, याची उत्सुकता शिगेला आहे.
 

Web Title: chota pudhari ghanashyam darode flirt with nikki tamboli in bigg boss marathi 5