बालपण देगा देवामधून विक्रम गोखले येणार रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 13:26 IST2017-05-24T11:09:46+5:302017-05-25T13:26:04+5:30
बालपण देगा देवा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बालपण देगा देवा’ या मालिकेत प्रेक्षकांना आजोबा-नातीचं हळूवार भावनिक ...

बालपण देगा देवामधून विक्रम गोखले येणार रसिकांच्या भेटीला
ब लपण देगा देवा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बालपण देगा देवा’ या मालिकेत प्रेक्षकांना आजोबा-नातीचं हळूवार भावनिक नातं उलगडण्यात येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून विक्रम गोखले पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात अण्णाची भूमिका विक्रम गोखले साकारणार आहेत तर नातीची भूमिका मैथिली पटवर्धन ही बालकलाकार साकारणार आहे. ही गोष्ट अल्लड परंतु हुशार, चौकस, निरागस आणि आजोबांची लाडकी आनंदी या छोट्या मुलीची आहे. जीचे आपल्या आजोबांवर जीवापाड प्रेम आहे. अण्णा म्हणजेच केशव कुलकर्णी हे शिस्तप्रिय आहेत त्यांनी आपल्या नातीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. अण्णांचं एकच स्वप्न आहे, त्यांना आनंदीला डॉक्टर बनवायचं आहे.
याभूमिकेबाबत विक्रम गोखले म्हणाले कि, “बालपण देगा देवा या मालिकेमध्ये आजोबा आणि नात याचं नातं म्हणजे दुधा वरच्या सायी सारख नाजूक आहे. इतर वयाच्या मुलामुलींपेक्षा आपली नातं अतिशय हुशार आहे, तिला प्रत्येक गोष्टीचे कार्य समजून घेण्याची सतत उत्कट इच्छा आहे याचं आजोबांना कौतुक आहे. तिला अंधश्रद्धांपासून कसं दूर ठेवायचं हे हा आजोबा त्याचं कर्तव्य मानतो. काही तरी भलतं-सलतं परंपरेने सांगितलेले नाही हे तिला सांगणे तसेच तिच्या सर्व प्रश्नांना वेळ मारून न्यायची असे न करता, तिला समजेल अशा भाषेत सांगणारा असा हा आजोबा आहे. आजोबांचा वैद्कीय पेशा आहे, तो ती मुलगी हळूहळू शिकते आहे या गोष्टीच आजोबाला खूप कौतुक आहे”. या मालिकेत मिलिंद शिंदे, भाग्यश्री राणे, यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.