छवी मित्तल लवकरच देणार गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 17:46 IST2018-11-26T17:45:38+5:302018-11-26T17:46:05+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री छवी मित्तल पुन्हा एकदा गुड न्यूज देणार आहे.

Chhavi Mittal will soon give good news | छवी मित्तल लवकरच देणार गुड न्यूज

छवी मित्तल लवकरच देणार गुड न्यूज

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री छवी मित्तल पुन्हा एकदा गुड न्यूज देणार आहे. ती प्रेग्नेंट असून नुकतेच तिने वर्कआऊट करतानाचे फोटो शेअर केले आहे. ज्या ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते आहे. 

तीन बहूरानियां', 'तुम्हारी दिशा', 'बंदिनी', 'घर की लक्ष्मी बेटियां', 'एक चुटकी आसमान'सारख्या टीव्ही शोजमध्ये काम केलेली अभिनेत्री छवी मित्तल हिने चार वर्षांपूर्वी २० डिसेंबर, २०१२ ला मुलगी अरीजाला जन्म दिला होता. डॉक्टरांनुसार धवी मे, २०१९ मध्ये बाळाला जन्म देणार आहे. धवीने दिग्दर्शक व लेखक मोहित हुसैनसोबत २००५ मध्ये लग्न केले होते.
याबाबत  छवी सांगते की, "कधी-कधी मला वाटते की, मला मुलगा व्हावा. माझ्या मुलीला भाऊ मिळेल. मग मी माझ्या जबाबदार मुलीकडे बघते तेव्हा वाटते की, मुलगीच व्हावी. मुलगा असो किंवा मुलगी मी आणि मोहित बाळाचे उत्साहात स्वागत करु, आम्हाला फक्त एक सुदृढ बाळ हवे आहे.


बऱ्याच कालावधीपासून छवी अभिनय करताना दिसली नाही. तिने अभिनयातील ब्रेकबद्दल सांगितले की, मला अनेक मालिकेतील भूमिकेसाठी विचारण्यात आले. पण, सर्वांचे चित्रीकरण मुंबईपासून बाहेर होते आणि प्रेग्नेंसीमध्ये हे सर्व मॅनेज करणे शक्य नसल्यामुळे मी सध्या ब्रेकवर आहे. 

Web Title: Chhavi Mittal will soon give good news