सायली संजीवसोबतची मालिका वेगळीच होती? चेतन वडनेरेचा खुलासा; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:43 IST2025-08-20T13:42:29+5:302025-08-20T13:43:12+5:30
'लपंडाव' मालिकेत सायली संजीवला रिप्लेस केल्याची चर्चा झाली, त्यावर चेतन वडनेरे पहिल्यांदाच बोलला आहे.

सायली संजीवसोबतची मालिका वेगळीच होती? चेतन वडनेरेचा खुलासा; म्हणाला...
'स्टार प्रवाह'वर लवकरच 'लपंडाव' ही मालिका सुरु होणार आहे. यामध्ये 'आई कुठे काय करते'फेम रुपाली भोसले असणार आहे. तसंच कृतिका देव आणि चेतन वडनेरे (Chetan Vadnere) ही फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. दरम्यान चेतन वडनेरेसोबत आधी सायली संजीव दिसणार होती. काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाहच्या पुरस्कार सोहळ्यात दोघांनी एकत्र मुलाखतही दिली. मग अचानक सायली संजीवला (Sayali Sanjeev) का रिप्लेस केलं असा प्रश्न चाहत्यांना पडला. आता याचं उत्तर स्वत: चेतननेच दिलं आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत चेतन वडनेरे म्हणाला, " "ही ती मालिकाच नाहीये जी मी आणि सायली करणार होतो. ती वेगळी मालिका होती आणि ती आता हिंदीत आलीये. त्यामुळे हिंदीत येतंय म्हटल्यावर तो प्रोजेक्ट लगेच मराठीत करता येत नाही. ते चॅनलचे काही कारणं आहेत. त्यामुळे ती मालिका जरा पोस्टपोन झाली. तोवर हा एक दुसरा शो पाईपलाईनमध्ये होता. तो मला मिळाला. शो बदलला मग सगळं कास्टिंगच बदललं. पण तो प्रोजेक्ट वेगळा होता आणि हा पूर्णपणे वेगळा आहे."
चेतन वडनेरे हा मूळचा नाशिकचा असून 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकांमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. तर सायली संजीवही नाशिकचीच आहे त्यामुळे त्यांची जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. सायलीला रिप्लेस करुन कृतिकाला आणण्यात आलं अशी चर्चा झाली. त्यावर आता चेतननेच सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान 'लपंडाव' मालिका १५ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. मालिकेत कृतिका ही सखीची भूमिका साकारत आहे. तर चेतन ड्रायव्हरच्या भूमिकेत आहे. रुपाली ही सखीची आई आहे. प्रोेमो पाहून मालिकेची कथा खूपच इंटरेस्टिंग वाटत आहे.