‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत ओम आणि स्वीटूच्या आयुष्यात येणार वेगळाच ट्विस्ट, असा होणार शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:05 IST2021-09-23T13:04:59+5:302021-09-23T13:05:35+5:30

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत स्वीटूला जरी मोहित सोबत झालेलं लग्न मान्य नसलं तरी ती घरच्यांसाठी ती खुश आहे असं त्यांना भासवून चेहऱ्यावर खोटं हसू आणतेय.

Check how will Sweetu meet Om in Yeu kashi tashi mi nandayla in its ending part | ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत ओम आणि स्वीटूच्या आयुष्यात येणार वेगळाच ट्विस्ट, असा होणार शेवट

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत ओम आणि स्वीटूच्या आयुष्यात येणार वेगळाच ट्विस्ट, असा होणार शेवट

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत ओम स्वीटू यांच्या लग्न विशेष भागानंतर एक विलक्षण वळण आल्याचे पाहायला मिळत आहे.  स्वीटूच लग्न मोहितसोबत झाल्यानंतर दोघेही ओमच्याच घरात राहत आहेत. स्वीटूला जरी मोहित सोबत झालेलं लग्न मान्य नसलं तरी ती घरच्यांसाठी ती खुश आहे असं त्यांना भासवून चेहऱ्यावर खोटं हसू आणतेय. स्वीटूला अजूनही माहित नाहीय की,ओम लग्नाच्या दिवशी कुठे होता आणि तर ओमसुद्धा स्वीटूच्या प्रेमाखातर तिला हे सत्य कळू देत नाहीय. मात्र आता लग्नाच्या दिवशी जे काही घडले त्याची कारण स्वीटूला समजणार आहेत. सगळ्या गोष्टी समजल्यानंतर स्वीटू कशी रिएक्ट करणार हे पाहणेही रंजक असणार आहे. 

तसेच ओम आणि स्वीटू एकत्र यावे अशी प्रेक्षकांची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे आता मालिकेत पुन्हा एकदा वेगळेच वळण येणार असल्याचे दिसतंय. पुन्हा एकदा स्वीटू आणि ओम हे लव्हबर्ड एकत्र येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. स्वीटून ओमसह लग्न करत संसार थाटणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे मालिकेत हॅप्पी एंडिग पाहायला मिळणार असल्यामुळे रसिकांसाठी आगामी भाग खूप स्पेशल आणि तितकाच रंजक असणार हे मात्र नक्की. 

ओम आणि स्वीटूला एकत्र आणण्यासाठी या मालिकेत एका नवीन चेहऱ्याची एंट्री झाली आहे. अभिनेत्री प्रिया मराठे मालिकेत सकारात्मक भूमिकेत दिसत आहे. ओम आणि स्वीटू पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी ती प्रयत्न करत असते.तिच्या येण्यानेच मालिका विलक्षण वळणावर पोहचलीय.

 

ओम आणि स्वीटू यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यात या व्यक्तिरेखेचा खूप मोठा हात असणार आहे.त्यामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत. दिवसेंदिवस येणाऱ्या नवीन वळणांमुळे मालिका अजूनच इंटरेस्टींग होत असल्याचे पाहायला मिळतंय.

मालिकेत केवळ ओम आणि स्वीटूच नाही तर  शकू, नलू, चिन्या, रॉकी आणि मालिकेतील सर्व पात्र ही प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतात. इतकंच काय तर या मालिकेतील खलनायिका म्हणजेच मालविका या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे.मालिकेमुळे  खऱ्या अर्थाने येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतल्या कलाकारांना एक वेगळीच ओळख मिळाली आहे. 

Web Title: Check how will Sweetu meet Om in Yeu kashi tashi mi nandayla in its ending part