Charu Asopa जूनमध्ये घेणार राजीव सेनसोबत घटस्फोट, म्हणाली-गोष्टी विचित्र....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 15:20 IST2023-01-28T15:15:09+5:302023-01-28T15:20:53+5:30
घटस्फोटच्या चर्चे दरम्यान चारु असोपा आणि राजीव सेन दोघे एकत्र दिसल्याने लोक असा अंदाज लावू लागले की कदाचित दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. पण...

Charu Asopa जूनमध्ये घेणार राजीव सेनसोबत घटस्फोट, म्हणाली-गोष्टी विचित्र....
Charu Asopa On Divorce With Rajeev Sen: टीव्ही अभिनेत्री चारू असोपा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राजीव सेन आणि तिचा घटस्फोट होणार या दरम्यान पुन्हा एकदा दोघे एकत्र दिसले. राजीव आणि चारु सतत एकमेकांवर आरोप करत असतात. मात्र दोघे एकमेकांसोबत एकत्र दिसल्याने, लोक असा अंदाज लावू लागले की कदाचित दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. मात्र, आता त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केले आहे.
जूनमध्ये होणार घटस्फोट
चारू असोपाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, आम्ही विभक्त होण्याचा निर्णय रद्द केलेला नाही. आम्ही जूनपर्यंत सहा महिन्यांसाठी कूलिंग ऑफ कालावधीवर आहोत. चारू असोपाने असेही सांगितले की, राजीवसोबतचे तिचे नाते सुधारले याचा तिला आनंद आहे. राजीवही आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं चारू सांगतात.
काही दिवसांपूर्वी चारू असोपा राजीव सेनच्या चुलत भावाच्या लग्नात एकत्र होते. तिने राजीवसोबतचे फोटो शेअर केले आणि त्याच्यासोबत 'पहला पहला प्यार' गाण्यावर डान्स केला. यामुळे लोकांनी तिला खूप ट्रोल केले. चारू म्हणाली, “अनेकांनी सांगितले की त्यांचे नाटकही सुरू झाले आहे. लोकांना मूर्ख बनवणे. काय करायचं ते मला माहीत आहे. बाबा (राजीवचे वडील) इतक्या प्रेमाने म्हणाले की, जियाना आली तर बरं वाटेल. माझे सासरे खूप छान आहेत. ती जियाना आणि माझ्या कुटुंबांचा नेहमीच भाग राहातील."
चारू असोपा यांनी राजीवसोबत लग्नात डान्स का केला तेही सांगितले. चारू म्हणाली, “आम्ही काकी (राजीवची काकी) यांच्या सांगण्यावरून केले. वातावरण चांगले होते, सर्वजण आनंदी होते. जियाना मोठी होते आहे. आमच्या मतभेदांमुळे तिच्यासाठी गोष्टी विचित्र व्हाव्यात असे आम्हाला वाटत नाही. ती तिच्या वडिलांना किंवा घरच्यांना भेटली तर मला वाईट वाटेल असा विचार तिने करू नये असे मला वाटते. म्हणूनच लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही." त्याच वेळी, राजीवने चारूशी घटस्फोटाबद्दल बोलण्यास नकार दिला, परंतु जियानाला आई आणि वडील दोघांचे प्रेम मिळावे अशी तिची इच्छा असल्याचे सांगितले.