"भाऊ कदमच नाही...", 'चला हवा येऊ द्या' चा नवा प्रोमो पाहून चाहते नाराज, बघा काय म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:34 IST2025-07-08T12:29:14+5:302025-07-08T12:34:58+5:30
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय आहे.

"भाऊ कदमच नाही...", 'चला हवा येऊ द्या' चा नवा प्रोमो पाहून चाहते नाराज, बघा काय म्हणाले...
Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय आहे. या शोचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. जवळपास १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता 'चला हवा येऊ द्या'चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठी वाहिनीवर येत्या २६ जुलै पासून याचा नवा सीझन प्रसारित केला जाणार आहे. आता एका मोठ्या ब्रेकनंतर हा शो पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
दरम्यान, 'चला हवा येऊ द्या' च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर करणार आहे. निलेश साबळे चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याने आता या पर्वात अभिजीत पाहायाला मिळणार आहे. श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव हे सेलिब्रिटी या शोमध्ये धमाल आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण महत्वाचं म्हणजे भाऊ कदम या शोचा भाग नसल्याने प्रेक्षकांची निराशा झाली आहे.सोशल मीडियावर 'चला हवा येऊ द्या' चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. कॉमेडीची सुपारी अख्खा महाराष्ट्र घेणार, कॉमेडीचा नवा डॉन आता कोण बनणार? चला हवा येऊ द्या - कॉमेडीचं गॅंगवॉर...", असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांच्या भरभरुन प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रोमो पाहून एका नेटकऱ्याने लिहिलंय, "भाऊ कदम पाहिजे तर मज्जा पाहायला...", तर आणखी एका यूजरने म्हटलंय, We want भाऊ कदम...", अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
'चला हवा येऊ द्या' च्या प्रत्येक स्किटमध्ये भाऊ कदम मध्यवर्ती भूमिकेत होते. पण आता भाऊ कदम, निलेश साबळे, अंकुर वाढवे, सागर कारंडे सारखे कलाकार शोचा भाग नसल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.