श्रेया बुगडेच्या या फोटोवर सामान्यच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील झाले फिदा, दिल्या अशा कमेंट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:30 IST2021-02-06T18:00:42+5:302021-02-06T18:30:34+5:30
श्रेयाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. श्रेयाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे.

श्रेया बुगडेच्या या फोटोवर सामान्यच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील झाले फिदा, दिल्या अशा कमेंट्स
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कार्यक्रमाला अनेक वर्षं झाली असून या कार्यक्रमाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या कार्यक्रमाद्वारे डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात.
श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. श्रेयाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. श्रेयाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. केवळ तिचे फॅन्सच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रेटीदेखील या फोटोवर भरभरून कमेंट्स करत आहेत. श्रेयाने हा फोटो शेअर केल्यानंतर केवळ एक तासांत १२ हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. अमृता खानविलकरने उफ्फ तर तेजस्विनी पंडितने ओये होय असे कमेंट लिहिले आहे. श्रेया या फोटोत समुद्रकिनारी दिसत असून तिने वन पीस आणि त्यावर साजेसे ॲक्सेसरीज घातले आहेत.
श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचसोबत समुद्र या नाटकात ती एका गंभीर भूमिकेत दिसली होती. या नाटकातील तिच्या आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते.