चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेचा नवरा आहे हँडसम, पाहा त्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:00 IST2019-08-06T06:00:00+5:302019-08-06T06:00:07+5:30

चला हवा येऊ द्या फेम श्रेयाचे लग्न झालेले असून तिच्या पतीचे नाव निखिल सेठ आहे.

Chala Hawa Yeu Dya fame shreya bugde husband nikhil sheth photo | चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेचा नवरा आहे हँडसम, पाहा त्याचे फोटो

चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेचा नवरा आहे हँडसम, पाहा त्याचे फोटो

ठळक मुद्देश्रेयाचे लग्न झालेले असून तिच्या पतीचे नाव निखिल सेठ आहे. त्यांचे लग्न २७ डिसेंबर २०१५ मध्ये झाले असून त्यांनी प्रेमविवाह केला आहे. श्रेया आणि निखिल यांची ओळख एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या कार्यक्रमाद्वारे डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. याच कार्यक्रमातील श्रेयाबाबत आम्ही काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत.

श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचसोबत समुद्र या नाटकात ती एका गंभीर भूमिकेत दिसली. या नाटकातील तिच्या आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकेचे नेहमीच कौतुक केले जाते.

श्रेया ही खूप चांगली अभिनेत्री असून ती सगळ्याच भूमिका खूपच छानप्रकारे पार पाडते. या सगळ्यामुळेच श्रेया प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली आहे.

श्रेयाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॉलो करत असतात.

श्रेयाच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते आणि ती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खाजगी आयुष्याविषयी आपल्या चाहत्यांना सांगत असते. 

श्रेयाचे लग्न झालेले असून तिच्या पतीचे नाव निखिल सेठ आहे. त्यांचे लग्न २७ डिसेंबर २०१५ मध्ये झाले असून त्यांनी प्रेमविवाह केला आहे. श्रेया आणि निखिल यांची ओळख एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या चित्रीकरणादरम्यान निखिल अनेकवेळा श्रेयासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. पण मैत्री न होता, त्यांच्यात काही कारणांनी वादच होत होते. या सगळ्यामुळे त्यांच्यात काही केल्या मैत्री होत नव्हती.

पण निखिल एका मालिकेचा कार्यकारी निर्माता बनला आहे हे श्रेयाला कळल्यावर तिने त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या संवादाला सुरुवात झाली.

त्यानंतर काहीच महिन्यात निखिलने श्रेयाला प्रपोज केले आणि तिने देखील नात्यासाठी होकार दिला. यानंतर दोघांच्या कुटुंबांच्या सहमतीने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले असून त्यांचे कपल त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. 

Web Title: Chala Hawa Yeu Dya fame shreya bugde husband nikhil sheth photo