'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची लव्हस्टोरी आहे हटके, त्याची पत्नी आहे खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 11:24 IST2021-06-30T11:23:48+5:302021-06-30T11:24:31+5:30

निलेश साबळे आज ३५ वा वाढदिवस साजरा करतो आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

'Chala Hawa Yeu Dya' fame Nilesh Sable's lovestory is very filmy, his wife is very beautiful | 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची लव्हस्टोरी आहे हटके, त्याची पत्नी आहे खूप सुंदर

'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची लव्हस्टोरी आहे हटके, त्याची पत्नी आहे खूप सुंदर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या'ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या शोमधील कलाकार निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे यांनीदेखील आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. निलेश साबळे आज ३५ वा वाढदिवस साजरा करतो आहे. सोशल मीडियावर निलेश साबळेवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

डॉ. निलेश साबळेचा २५ जून, १९८६ला जन्म झाला आहे. तो आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एम. एस. पदवीधर आहे.  लेखन, सूत्रसंचालन आणि विनोदी कौशल्याने चला हवा येऊ द्या शोला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. या शोला प्रेक्षकांची भरघोस पसंती मिळते आहे.  आधी मैत्री मग प्रेम आणि त्यानंतर लग्न अशी आहे निलेश साबळेची लव्हस्टोरी.


२०११ साली निलेश साबळेने पुण्यातील मैत्रीण गौरीसोबत लग्न केले. एका कार्यक्रमादरम्यान निलेश गौरीच्या कॉलेजमध्ये गेला होता. तिथे त्याची गौरीसोबत ओळख झाली आणि तिथूनच त्यांची प्रेमकथा फुलू लागली. दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.


निलश साबळेने डॉक्टरकी करण्यात काही रस नसल्याचे आधीच गौरीला सांगितले होते. गौरीचीही यावर काहीच हरकत नव्हती. त्यानंतर निलेश आणि गौरी दोघे विवाहबंधनात अडकले. निलेशच्या करिअरसाठी गौरी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली.

गौरी साबळे देखील ग्रॅज्युएट असून तिचा सिनेइंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. निलेश आणि गौरीचा गेल्या १० वर्षांपासून सुखी संसार सुरू आहे. 

Web Title: 'Chala Hawa Yeu Dya' fame Nilesh Sable's lovestory is very filmy, his wife is very beautiful