‘छत्रीवाली’च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 09:45 PM2018-10-10T21:45:43+5:302018-10-10T21:46:31+5:30

स्टार प्रवाहच्या ‘छत्रीवाली’ या मालिकेने नुकताच १०० एपिसोड्सचा टप्पा पार केला. या निमित्ताने सेटवर केक कापून जंगी सेलिब्रेशन करण्यात आले.

Celebration on Chatri Serial set | ‘छत्रीवाली’च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन

‘छत्रीवाली’च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन

googlenewsNext
ठळक मुद्दे‘छत्रीवाली’ या मालिकेने १०० एपिसोड्सचा पार केला टप्पा

 

स्टार प्रवाहच्या ‘छत्रीवाली’ या मालिकेने नुकताच १०० एपिसोड्सचा टप्पा पार केला. या निमित्ताने सेटवर केक कापून जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्यामुळे सेटवर उत्साहाचं वातावरण होतं. छत्रीवाली मालिकेच्या यापुढील भागांमध्येही नवनवी वळणं येऊन मालिकेचं कथानक अधिक रंजक होणार आहे.

मालिकेचं कथानक उत्तमरित्या सादर करण्यात येत असल्यामुळेच प्रेक्षक त्यात गुंतून राहिले आहेत. मधुरा आणि विक्रम या जोडीलाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. या प्रेमाच्या जोरावरच आतापर्यंतची वाटचाल झाली आणि यापुढेही प्रेक्षकांना असाच भरभरुन आनंद देण्याचा आमचा प्रयत्न असेल’ अशी भावना संकेत पाठक आणि नम्रता प्रधानने व्यक्त केली.
‘छत्रीवाली‘ या मालिकेत प्रेक्षकांना एका मुलीची कथा पाहायला मिळणार आहे. छत्रीवाली ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या मधुराची. तर तिकडे जबाबदारीचं भान नसलेला, लाडात वाढलेला मधुराच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आणि तिच्या साधेपणाची सतत टिंगल उडवणारा विक्रम आहे. या दोघांवर आधारीत मालिका आहे. ‘छत्रीवाली‘ या मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संकेत पाठकने या पूर्वी स्टार प्रवाहच्याच दुहेरी या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या प्रोमोजनी सोशल मीडियामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.  या मालिकेचा प्रोमो पाहून या मालिकेचे नाव छत्रीवाली का ठेवले आहे असा प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहे. ही नायिका आपल्याला प्रत्येक भागात छत्रीसोबतच पाहायला मिळणार असे आपल्याला हा प्रोमो पाहूनच कळत आहे. ‘छत्रीवाली‘ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

 

Web Title: Celebration on Chatri Serial set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.