"तुला गोळी लागली तेव्हा...?" गोविंदाला शिल्पा शेट्टीने विचारलेला असा प्रश्न की सर्व खळखळून हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:57 IST2024-11-24T16:57:12+5:302024-11-24T16:57:58+5:30

गोविंदाने कपिल शर्मा शोमध्ये हा मजेशीर किस्सा सांगितला. त्यामुळे सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली

bollywood actor govinda share funny incident of shilpa shetty asked about bullet fire question | "तुला गोळी लागली तेव्हा...?" गोविंदाला शिल्पा शेट्टीने विचारलेला असा प्रश्न की सर्व खळखळून हसले

"तुला गोळी लागली तेव्हा...?" गोविंदाला शिल्पा शेट्टीने विचारलेला असा प्रश्न की सर्व खळखळून हसले

अभिनेता गोविंदा हा सर्वांचा लाडका अभिनेता. गोविंदाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. गोविंदाने त्याच्या सिनेमांमधून आपल्याला खळखळून हसवलंय. याशिवाय गोविंदाच्या काही भावुक भूमिका पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येतं. गोविंदा नुकतंच द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झालेला. यावेळी गोविंदाने उपस्थिती दर्शवली होती. पायाला गोळी लागल्याच्या प्रकरणानंतर गोविंदा पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात दिसला. त्यावेळी त्याने सांगितलेला शिल्पा शेट्टीचा किस्सा ऐकून सर्वांचीच हसून हसून पुरेवाट झाली.

गोविंदाला शिल्पा शेट्टीने विचारलेला मजेशीर प्रश्न

कपिल शर्मा शोमध्ये गोविंदाने सांगितलं की, जेव्हा शिल्पा शेट्टी त्याला भेटायला गेली तेव्हा तिने गोविंदाला विचारलं की, "चीची, तुला ही जखम कशी झाली?  त्यावेळी सुनीता (गोविंदाची पत्नी) कुठे होती?" गोविंदाने सांगितलं की, सुनीता मंदिरात गेलेली. त्यावेळी शिल्पाने मजेशीर अंदाजात विचारलं की, "सुनीता मंदिरात गेलेली तर तुला गोळी कोणी मारली." गोविंदाने हा खुलासा करताच अर्चना पूरन सिंगसोबत सर्व खळखळून हसले.

कपिल शर्माचा गोविंदा स्पेशल एपिसोड कधी बघाल?

या आठवड्यात शनिवारी ३० नोव्हेंबरला द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोचा हा एपिसोड तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघायला मिळेल. या एपिसोडमध्ये गोविंदासोबतच शक्ती कपूर, चंकी पांडे हे कलाकारही पाहायला मिळत आहेत. पायाला गोळी लागल्यानंतर गोविंदा पहिल्यांदाच ओटीटीवरील या कार्यक्रमात दिसणार आहे. याशिवाय पहिल्यांदाच गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक या दोघांची कॉमेडी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

 

Web Title: bollywood actor govinda share funny incident of shilpa shetty asked about bullet fire question