'बीचवाले – बापू देख रहा है'मध्‍ये बॉबी बीचवाले न्‍यायासाठी घेणार सोशल मीडियाचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 02:30 PM2018-10-25T14:30:49+5:302018-10-26T07:15:00+5:30

आगामी एपिसोड्समध्‍ये बॉबी बीचवाले (झाकीर हुसैन) स्‍वत:च उपचार केल्‍याने आजारी पडताना आणि न्‍यायासाठी सोशल माध्‍यमाचा आधार घेताना दिसणार आहे.

Bobby Beachwale will take the basis of the social media base for 'Beachwale - Bapu watching' | 'बीचवाले – बापू देख रहा है'मध्‍ये बॉबी बीचवाले न्‍यायासाठी घेणार सोशल मीडियाचा आधार

'बीचवाले – बापू देख रहा है'मध्‍ये बॉबी बीचवाले न्‍यायासाठी घेणार सोशल मीडियाचा आधार

googlenewsNext
ठळक मुद्दे'बीचवाले' मालिकेत बॉबी बीचवाले न्यायासाठी घेणार सोशल मीडियाचा आधार

सोनी सबवरील नवीन विनोदी मालिका 'बीचवाले' आपल्‍या लक्षणीय संकल्‍पनेसह प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे आणि विशेषत: मध्‍यमवर्गीय प्रेक्षकांना ही मालिका खूपच आवडत आहे. आगामी एपिसोड्समध्‍ये बॉबी बीचवाले (झाकीर हुसैन) स्‍वत:च उपचार केल्‍याने आजारी पडताना आणि न्‍यायासाठी सोशल माध्‍यमाचा आधार घेताना दिसणार आहे.

बॉबीच्‍या सासरच्‍या माणसांनी पाठवलेले लिंबूचे लोणचे खाल्‍ल्‍याने त्‍याचा घसा दुखतो आहे आणि त्‍यामुळे तो बोलू शकत नाही. बॉबी आणि त्‍याची पत्‍नी चंचल (अनन्‍या खरे) यासाठी इंटरनेटवर उपायाचा शोध घेत असतात. त्‍यांना डॉ. नाडीवालाबाबत समजते. पण उपचारानंतर स्थिती अधिकच खालावून जाते. बॉबीला या सर्वाचा राग येतो आणि तो डॉक्‍टर व त्‍याच्‍या कामाची बदनामी करण्‍यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्‍याची योजना आखतो. दुसऱ्या दिवशी वीज पुरवठा खंडित झाला असताना चंचलला वीजेचा झटका बसतो आणि तिच्‍यावर उपचारासाठी डॉक्‍टरला बोलावले जाते. तो बॉबीकडे पाहतो, तेव्‍हा त्‍याला समजते की बॉबी हाच सोशल मीडियाचा उपयोग करून डॉक्‍टरच्‍या संपूर्ण समुदायाची बदनामी करणारी व्‍यक्‍ती आहे.

बॉबी बीचवालेची भूमिका साकारणारा झाकीर हुसैन म्‍हणाला, ''बीचवाले' या मालिकेचा भाग असल्‍याचा मला आनंद आहे. आम्‍हाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम मिळत आहे. आगामी एपिसोडमध्ये सोशल मीडिया वरदान की शाप या चर्चित विषयाला आणि मध्‍यमर्गीय न्‍यायासाठी त्‍याचा कशाप्रकारे वापर करता येतो, हे दाखवले जाणार आहे.' बॉबीच्‍या या सोशल मीडियावरील कृत्‍यानंतर देखील डॉक्‍टर चंचलवर उपचार करेल का? बॉबीला पश्चात्ताप होईल का? हे पाहण्यासाठी ही मालिकेचा आगामी भाग पाहावा लागेल.

Web Title: Bobby Beachwale will take the basis of the social media base for 'Beachwale - Bapu watching'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.