जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोवरच्या ब्रेकअपला बिपाशा बासु नाहीतर,कारणीभूत ठरला होता हा सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 12:26 IST2017-07-06T06:55:43+5:302017-07-06T12:26:41+5:30
करणसिंह ग्रोव्हर आणि जेनिफर विंगेट या दोघांनी एकमेकांसपासून काडीमोड घेतला आणि दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. सगळ्यात शॉकिंग म्हणजे करणसिंह ...

जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोवरच्या ब्रेकअपला बिपाशा बासु नाहीतर,कारणीभूत ठरला होता हा सिनेमा?
क णसिंह ग्रोव्हर आणि जेनिफर विंगेट या दोघांनी एकमेकांसपासून काडीमोड घेतला आणि दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. सगळ्यात शॉकिंग म्हणजे करणसिंह ग्रोव्हरने चक्क बिपाशासोबत लग्न करत नव्याने संसार थाटला. दोघेही त्यांच्या करिअरमुळे नाही तर त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. तर जेनिफर विंगेट आपल्या मालिकांच्या शूटिंगमध्ये बिझी असते. मात्र जेनिफर आणि करण जिथे कुठे मीडियासमोर येतात तेव्हा या दोघांना त्यांच्या रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारले जातात. नेहमीच हे दोघेही काहीही कारणं देत ही वेळ निभावूनही नेतात.एका कार्यक्रमात रिलेशनशिपबाबत विचारलेल्या प्रश्नाला जेनिफरने दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा करण-जेनिफर चर्चेत आले आहेत. करणसोबत लग्न करणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असं जेनिफरनं म्हटलं आहे. जेनिफर आजही तिचं प्रेम विसरु शकलेली नाही. जिथं जावं तिथे करणविषयी विचारल्या जाणा-या प्रश्नांमुळेही करणचा विचार तिच्या डोक्यातून काही जात नाही. गेल्याच वर्षी करणने जेनिफरला घटस्फोट देत बॉलिवूड ब्युटी बिपाशा बासूसह लग्न केले.
![]()
खरंतर 'दिल मिल गये' मालिकेच्या सेटवर जेनिफर आणि करणची भेट झाली होती. दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की, दोघांनाही सतत एकमेकांच्या नावाने चिडवले जायचे. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतर जेनिफरला करणचा खरा चेहरा समोर आला आणि दोघांमध्ये खटके उडायला सुरूवात झाली. दोघांनाही एकमेकांसह राहणंही जेव्हा अशक्य वाटू लागले तेव्हा यांनी वेगळे होण्याच निर्णय घेतला. करणने जेनिफरआधी श्रद्धा निगमसह पहिले लग्न केले होते. मात्र तेही जास्त दिवस टिकले नाही. पहिले लग्न संपुष्टात आल्यानंतर जेनिफरशी त्याने लग्न केले आणि दुसरे लग्नही संपुष्टात आल्यानंतर त्याने तिसरे लग्न बिपाशा बासूसह केले. त्यांच्या लग्न आता वर्ष झाले आहे.जेनिफरसह घटस्फोट का झाला हे कारण अद्यापही समोर आले नव्हते.मात्र दोघांचा घटस्फोटाला कारणीभूत ठरला एक सिनेमा. 'अलोन' सिनेमासाठी करण आणि बिपाशा एकत्र शूटिंग करत होते. त्यावेळी करणची बिपाशाह जवळीक वाढु लागली आणि जेनिफर दूर जाऊ लागली. हीच गोष्ट जेनिफरला खटकत होती. अखेर त्याने त्याचे आयुष्य त्याच्याप्रमाणे जगू देण्यासाठी जेनिफरने मोकळीक दिली. त्यामुळेच आज जेनिफर एकटी आणि करण बिपाशाह आपले आयुष्य फुल ऑन एन्जॉय करत आहेत.