Bigg Boss10: लहानपणी अशी दिसायची बानी जे,सोशलमीडियावर बहिणीने शेअर केले बानीचे Childhood Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 12:16 IST2017-01-30T06:30:37+5:302017-01-30T12:16:12+5:30
बिग बॉसचा 10 विजेता मनवीर गुर्जर बनला आणि अखेर बिग बॉसचे 10वे पर्व संपले. मात्र अजूनही बिग बॉस शोची ...

Bigg Boss10: लहानपणी अशी दिसायची बानी जे,सोशलमीडियावर बहिणीने शेअर केले बानीचे Childhood Photo
ref="मनवीर गुर्जर ठरला ‘बिग बॉस १०’चा विजेता">बिग बॉसचा 10 विजेता मनवीर गुर्जर बनला आणि अखेर बिग बॉसचे 10वे पर्व संपले. मात्र अजूनही बिग बॉस शोची जादू रसिकांवरून कमी झालेली नाहीय. या स्पर्धकांच्या चाहत्यांना बिग बॉसच्या स्पर्धकांचे खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात अधिक रस वाटतोय. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी मनवीर गुर्जर, मनु पंजाबी, बानी जे आणि लोपामुद्रा राऊत हे त्यांच्या खाजगी आयुष्यात कसे राहायचे? यांरख्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकांचे फेसबूक प्रोफाईल किंवा मग इन्स्टाग्राम चेक करतायेत.सगळ्यांत जास्त लोपामुद्रा राऊत आणि मनवीर गुर्जर यांच्या लूक विषयी चर्चा करण्यात आली. त्यांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत त्यांचे काही खास फोटो नेटीझन्सने वेगवेगळ्या युक्त्या लढवत शोधून काढले आहेत.बिग बॉसच्या घरात शरीरावर अनेक टॅटू आणि मस्कुलर बॉडीमुळेच बानी जे ही स्पर्धक अनेकांचे आकर्षण ठरली.तिच्या फिटनेसविषयी बिग बॉसच्या इतर स्पर्धकांनी भरभरून चर्चा केली. फिटनेस लव्हर म्हणून बिग बॉसच्या घरातली ही एकमेव स्पर्धक जिने तिच्या हटके स्टाइलने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले.मात्र बानी जे लहानपणी कशी दिसायची याविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असेन. तर एक नजर टाकूयात बानी जेच्या लहानपणीच्या काही खास फोटोंवर.
![]()
बानीच्या बहिणीने बानीचे लहानपणीचे फोटो सोशलमीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहताच तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.आपल्या मस्कुलर बॉडीमुळे चाहत्यांची वाहवा मिळवणारी ही धाकड गर्ल लहानपणापासूच चुलबुली, मजा मस्ती करणारी आहे. शेअर केलेल्या एका फोटोत बानी तिच्या बहिणीने घातलेला मुकूटला हात लावण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. लाल रंगाच्या साडीमध्ये दोघांनी एका सास्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता त्यावेळी काढलेला हा फोटो आहे.
![]()
तर दुस-या फोटोत बानी आपल्या बहिणीसह घरात खेळताना दिसतेय. कुत्र्याच्या पिल्लुवर हाताने गोंजारताना दिसतेय.शॉर्ट हेअर, पाढ-या रंगाचा फ्रॉकमध्ये दिसणारी ही बानी आज बिग बॉस 10ची दुसरी रनरअप ठरली आहे.