‘बिग बॉस’फेम पूजा मिश्रा इतरांना देणार सिनेमात झळकण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:45 AM2018-04-20T10:45:59+5:302018-04-20T16:15:59+5:30

रिअॅलिटी शोमधील स्टार आणि सध्या निर्माती झालेली पूजा मिश्रा स्वतःचा नवीन रिअॅलिटी शो ‘स्पेअर मी द क्रॅब मेंटॅलिटी!’ घेऊन ...

'Bigg Boss'' pooja mishra gives others the chance to be seen in the cinema | ‘बिग बॉस’फेम पूजा मिश्रा इतरांना देणार सिनेमात झळकण्याची संधी

‘बिग बॉस’फेम पूजा मिश्रा इतरांना देणार सिनेमात झळकण्याची संधी

googlenewsNext
अॅलिटी शोमधील स्टार आणि सध्या निर्माती झालेली पूजा मिश्रा स्वतःचा नवीन रिअॅलिटी शो ‘स्पेअर मी द क्रॅब मेंटॅलिटी!’ घेऊन येत आहे.या शोमधील जो विजेता असेल तो आगामी चित्रपट ‘जुद’मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.मुळात पूजा मिश्रा ही तिच्या कामापेक्षा नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असते. बिग बॉसमध्येदेखील पूजा स्पर्धक म्हणून गेली होती. बिग बॉसच्या घरात असताना तिचा अनेक जणांसोबत वाद झाला होता.'बिग बॉस सिझन 5' मधील सगळ्यात वादग्रस्त स्पर्धक म्हणून तिला ओळखले जाते. पूजाने 'दिल का रिश्ता' या चित्रपटात एक आयटम साँगदेखील सादर केले होते.पूजा आता मॉडलिंग आणि अभिनयानंतर निर्मितीकडे वळली आहे.पूजा सध्या वेबसिरीज ‘लव्हसूत्र’ची निर्मिती करत असून ती सध्या ‘हंगामा प्लेअॅप’वर प्रसारित होत आहे.चार महिने ‘इ24’ या बॉलिवूड वृत्तवाहिनीवर यशस्वीपणे ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या टीव्ही शोची यशस्वी निर्मिती केल्यावर या नवीन रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आता करमणूकीचा हा सिलसिला आणखीच गडद होणार आहे. या मालिकेत प्रत्येक भागामध्ये नवनवीन परीक्षक येणार आहेत. हे परीक्षक वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील.नव्याने चित्रपटांमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही अत्यंत नम्र स्वभावाची निर्माती नवनवीन संधी उपलब्ध करून देवू इच्छिते. त्याचबरोबर मनोरंजन विश्वातील प्रस्थापित चेहऱ्यांनाही येथे संधी मिळणार आहे. या निर्मातीच्या निर्मिती कंपनीची टॅगलाईन आहे – क्रॅकिंग द क्रॅब मेंटॅलीटी! यू गो गर्ल! आणि हेच ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरविण्याचे उद्दिष्ट घेऊन ही निर्मिती होत आहे.

 

Web Title: 'Bigg Boss'' pooja mishra gives others the chance to be seen in the cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.