Bigg Boss OTT 2 : मुलांच्या आठवणीत रडू लागली आलिया सिद्दीकी, म्हणाली - 'घटस्फोट नसता घेतला तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 16:46 IST2023-06-22T16:45:47+5:302023-06-22T16:46:29+5:30

Bigg Boss OTT 2: नवाजुद्दीन सिद्दीकीची माजी पत्नी आलिया सिद्दीकी बिग बॉस ओटीटी २मध्ये सहभागी झाली. शेवटच्या एपिसोडमध्ये ती आपल्या मुलांच्या आठवणीत रडू लागली.

Bigg Boss OTT 2: Alia Siddiqui started crying remembering her children, said - 'If there was no divorce...' | Bigg Boss OTT 2 : मुलांच्या आठवणीत रडू लागली आलिया सिद्दीकी, म्हणाली - 'घटस्फोट नसता घेतला तर...'

Bigg Boss OTT 2 : मुलांच्या आठवणीत रडू लागली आलिया सिद्दीकी, म्हणाली - 'घटस्फोट नसता घेतला तर...'

बिग बॉस ओटीटी सीझन २ (Bigg Boss OTT 2) नुकताच लॉन्च झाला आहे. शोमध्ये १३ स्पर्धक आहेत जे वेगवेगळ्या प्रवाहातून आले आहेत. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawazuddin Siddiqui)ची माजी पत्नी आलिया सिद्दीकी(Aaliya Siddiqui)ही या शोमध्ये सहभागी झाली आहे. आलियाला पाहणे लोकांना आवडते. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये आलियाला तिच्या मुलांची आठवण आली. त्यानंतर ती त्यांच्या आठवणीत रडू लागली. ती एकटीच बसून रडायला लागली. आलियाला रडताना पाहून तिचा मित्र अभिषेक मल्हान तिच्याजवळ गेला आणि तिच्याशी बोलू लागला.

अभिषेकशी बोलताना आलियाने सांगितले की, ती तिच्या मुलांना मिस करत आहे. विशेषतः मुलाचे. मुलाबद्दल बोलताना आलिया म्हणाली की माझा धाकटा मुलगा माझ्यासारखा आहे. तो सर्वकाही स्वतःमध्ये ठेवतो. जर तो मला मिस करत असेल तर तो कोणालाही सांगणार नाही. मी पण अशीच आहे, मी माझ्या समस्या माझ्या मनात साठवून ठेवते आणि कोणाशीही शेअर करत नाही.

घटस्फोट घेतला नसता तर मी

आलिया पुढे म्हणाली की,  तो बोलू शकत नाही, माझी मुलगी बोलते. त्रासाचा विचार करून तो पुन्हा आजारी पडतो. त्याला ताप येईल की काहीतरी, त्यावेळी त्याला माझी गरज असते. खरंच, मी घटस्फोट घेतला नसता तर मी त्याला सोडून कधीच इकडे आली नसती. हे माझ्या करिअरसाठी आहे. मी अंघोळ करत होते तेव्हा मनात आले पण आयुष्यात जे काम घेतले आहे ते पूर्ण करणे आवश्यक आहे.

नवाजने दिले प्रोत्साहन

बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी आलिया स्टेजवर सलमान खानशी बोलली होती. जिथे तिने सांगितले की, नवाजने तिला शोमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तिने सांगितले होते की नवाजने तिला टेन्शन न घेता शोमध्ये जाण्यास सांगितले होते आणि तो मुलांना सुट्टीसाठी पॅरिसला घेऊन जाईल.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results


 

Web Title: Bigg Boss OTT 2: Alia Siddiqui started crying remembering her children, said - 'If there was no divorce...'