बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 08:37 IST2025-11-25T08:36:34+5:302025-11-25T08:37:23+5:30
Bigg Boss Marathi 6: छोट्या पडद्यावर सर्वात चर्चेतला शो म्हणजे 'बिग बॉस' मराठीचा सहावा सीझन येणार

बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनची घोषणा झाली आहे. कालच कलर्स वाहिनीने पहिला प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला. अर्थात ही फक्त घोषणा आहे त्यामुळे यंदाच्या सीझनचा होस्ट रितेश देशमुखच असणार की आणखी कोण हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. मात्र वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडीओतून यंदाच्या पर्वाची थीम नक्की काय असेल याचा अंदाज येत आहे. प्रेक्षक या सीझनसाठी कमालीचे उत्सुक आहेत.
छोट्या पडद्यावर सर्वात चर्चेतला शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या हिंदी 'बिग बॉस'चा १९ वा सीझन सुरु आहे. लवकरच याचा फिनाले होणार आहे. त्यानंतर बहुप्रतिक्षित मराठी बिग बॉस सुरु होईल. कलर्सने बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची घोषणा करत पहिला प्रोमो शेअर केला. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अनेक दरवाजे दिसत आहेत. त्यानंतर स्वर्ग आणि नरक अशा दोन दरवाजांची झलक दिसते. बिग बॉस मराठी लवकरच...अशी घोषणा होते. बिग बॉसचा लोगोही यावेळी वेगळा आणि सुंदर दिसत आहे.
या प्रोमोवर अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अक्षय केळकर, उत्कर्ष शिंदे या माजी सदस्यांनी कमेंट केली आहे. तसंच प्रेक्षकांनीही कमेंट करत उत्सुकता व्यक्त केली आहे. याआधी पाचव्या पर्वाचा विजेचा सूरज चव्हाण झाला होता. रितेश देशमुखने पहिल्यांदाच बिग बॉस होस्ट केलं होतं. आता बिग बॉस ६ चा होस्ट कोण आणि यंदाचे स्पर्धक कोण असणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. लवकरच याचीही अधिकृत घोषणा होईल.