सूरज चव्हाणला Bigg Boss मुळे मिळाली सुवर्णसंधी, शिंदे कुटुंबाच्या गाण्यात झळकण्याची थेट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 17:50 IST2024-09-09T17:49:14+5:302024-09-09T17:50:28+5:30
उत्कर्ष शिंदे काल सूरजला काय म्हणाला?

सूरज चव्हाणला Bigg Boss मुळे मिळाली सुवर्णसंधी, शिंदे कुटुंबाच्या गाण्यात झळकण्याची थेट ऑफर
बिग बॉस मराठी चा पाचवा (Bigg Boss Marathi Season 5) सीझन सध्या खूप चर्चेत आहे. रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यावेळी घरात सहभागी झालेल्या बारामतीच्या सूरज चव्हाणला (Suraj Chavan) अनेक चाहते पाठिंबा देत आहेत. सूरज अतिशय साधा भोळा असून तोच ट्रॉफी जिंकला पाहिजे असं अनेकांचं मत आहे. सोशल मीडियावर तर त्याची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. इतकंच नाही तर सूरजला आता एका गाण्यात झळकण्याची संधी मिळणार आहे.
काल बिग बॉसचा गणेशोत्सव स्पेशल एपिसोड झाला. यामध्ये बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि गायक उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) आला होता. स्पर्धकांसाठी त्याने छान खेळाचं आयोजन केलं होतं. यामुळे सगळ्यांचंच मनोरंजन झालं. उत्कर्षने काही स्पर्धकांसाठी रितेश देशमुखने दिलेले गिफ्ट्स आणले होते. अंकिता, जान्हवी, वैभव, धनंजय यांच्या घरी बसलेल्या गणपतीचे फोटो त्याने आणले. ते पाहून हे चौघंही भावूक झाले. तर सूरजला मी गिफ्ट देणार असं उत्कर्ष म्हणाला. सूरजसमोर जात उत्कर्ष म्हणाला, "तुझ्यासाठी आमचं शिंदे कुटुंब गाणं तयार करणार. तू घरात कोंबळी पळाली वर डान्स केलास. आता या गाण्यात तू स्वत: झळकणार. आनंद शिंदे हे गाणं गाणार."
हे खास सरप्राईज ऐकून सूरजही भारावून जातो. तो उत्कर्ष शिंदेचे आभार मानतो. तसंच बाप्पाचा आशीर्वाद म्हणत तो गणरायाच्या पाया पडतो. सूरज चव्हाणची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या आठवड्यात तर तो घराचा कॅप्टनही बनला आहे. आता आणखी किती आठवडे तो घरात टिकून राहतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.