'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर घराबाहेर? रितेशने जाहीर करताच सर्वांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 16:56 IST2024-09-01T16:56:10+5:302024-09-01T16:56:44+5:30

पाचव्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत हे नॉमिनेट झाले होते.  

Bigg Boss Marathi Season 5 riteish deshmukh announced Kokan Hearted Girl ankita walawalkar eviction | 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर घराबाहेर? रितेशने जाहीर करताच सर्वांना अश्रू अनावर

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर घराबाहेर? रितेशने जाहीर करताच सर्वांना अश्रू अनावर

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन एक महिना झाला आहे. पाचव्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत हे नॉमिनेट झाले होते.  व्होटिंग लाइन्स बंद असल्यामुळे या आठवड्यात कोणीच घराबाहेर जाणार नाही, असा अंदाज प्रेक्षकांचा होता. पण, 'बिग बॉस मराठी'ने नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर घराबाहेर पडताना पाहायला मिळतेय. हे पाहून सर्वंच प्रेक्षकांना धक्का बसलाय. 

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो सर्वांना थक्क करणारा आहे. प्रोमोमध्ये रितेश म्हणतो, "या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं  नाव आहे अंकिता". त्यानंतर अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घराची पहिली कॅप्टन अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत.


‘बिग बॉस मराठी’ने शेअर केलेल्या प्रोमोवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. "जाहिर निषेध, आम्हाला हे पटलं नाही", "पण या आठवड्यात वोटिंग बंद होते ना?", "अरे सरळ गेम आहे अंकिताला सिक्रेट रुममध्ये तरी ठेवतीलकिंवा बाहेर आणून गेम दाखवून पुढच्या आठवड्यामध्ये लगेच वाईल्ड कार्ड आणतील. आजपर्यंत एविक्शन दाखवलं नाहीये, आता कसं दाखवतील.. मेकर्सना माहितीये अंकिता ही स्ट्राँग खेळाडू आहे तिचं एविक्शन बघण्यासाठी TRP हमखास वाढणार",अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य बाहेर पडले आहेत.  भाऊच्या धक्क्यावरील आजच्या भागात नेमकं काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.  ‘बिग बॉस मराठी’ हा शो दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होतो. तसेच तुम्ही जिओ सिनेमावरही हा शो पाहू शकता.
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 riteish deshmukh announced Kokan Hearted Girl ankita walawalkar eviction