"बोलायलाही नको वाटतं", 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच कुणाला 'कडू कारलं' म्हणाले पॅडी ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 11:47 IST2024-10-01T11:46:56+5:302024-10-01T11:47:28+5:30

गेल्या रविवारी पंढरीनाथ कांबळे हे 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडले.

Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble on Dhananjay Powar Nikki tamboli Abhijeet sawant and Ankita | "बोलायलाही नको वाटतं", 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच कुणाला 'कडू कारलं' म्हणाले पॅडी ? 

"बोलायलाही नको वाटतं", 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच कुणाला 'कडू कारलं' म्हणाले पॅडी ? 

'बिग बॉस मराठी' हे आता अंतिम टप्प्यात आहे. यंदाचं पाचवं पर्व अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यापूर्वीच्या सीझनमध्ये एकूण शंभर दिवसांचा खेळ दाखवण्यात आला होता. मात्र, या पर्वाच्या बाबतीत 'बिग बॉस'ने मोठा निर्णय घेत दहा आठवड्यांमध्ये हा सीझन संपेल अशी घोषणा केली. गेल्या रविवारी सात सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यापैकी अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांनी घराचा निरोप घेतला. घराबाहेर आल्यावर त्यांनी प्रत्येक सदस्याबद्दल मत व्यक्त केलं. 

गेल्या रविवारी पंढरीनाथ कांबळे हे 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडले. अगदी ग्रँड फिनालेच्या जवळ येताच त्यांचा प्रवास संपला.  पंढरीनाथ कांबळे यांनी घराबाहेर येताच विविध ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. यावेळी 'टोटल मराठी'शी बोलताना त्यांनी घरातील सदस्यांना फळांची उमपा दिली. यावेळी त्यांनी निक्कीला कडू लिंबू म्हटलं. तर अंकिताला ते कोकणातील हापूस अंबा म्हणाले. 

एवढंच काय तर धनंजय पोवारला त्यांनी थेट कडू कारल्याची उपमा दिली. धनंजयशी बोलायलाही नको वाटतं, असे ते म्हणाले. तर सुरज चव्हाणला त्यांनी अक्रोड म्हटलं. जो बाहेरून तर कडक असतो. मात्र, आतून अगदी मऊ, तसा अक्रोडासारखा सुरज असल्याचं त्यांनी म्हटलं. याशिवाय, पंढरीनाथ यांनी जान्हवीला थेट फणसाची उपमा दिली. तर अभिजीत हा केळासारखा आहे. तो त्याच्या सालीवरुन कधीही तुम्हाला घसरून पाडू शकतो, असे त्यांनी म्हटलं. 


पंढरीनाथ कांबळे हे  मराठी मनोरंजनसृष्टीतील एक विनोदी अभिनेता आहे. हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळेने मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम केलं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारणारा पंढरीनाथ घराघरात लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात देखील त्याच्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble on Dhananjay Powar Nikki tamboli Abhijeet sawant and Ankita