'बिग बॉस' प्रेमींना पाहायला मिळणार जखमी वाघीण जान्हवी किल्लेकरची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 17:21 IST2024-10-02T17:20:20+5:302024-10-02T17:21:01+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : ग्रँड फिनाले आधी, बिग बॉसच्या घरातील सदस्य घराबाहेर येत फॅन्सच्या उपस्थिती जोरदार ग्रँड सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. यावेळी बिग बॉस सदस्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची झलक दाखवत आहेत.

'बिग बॉस' प्रेमींना पाहायला मिळणार जखमी वाघीण जान्हवी किल्लेकरची गोष्ट
'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाच्या ( Bigg Boss Marathi Season 5 ) अंतिम आठवड्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. निक्कीने तिकीट टू फिनालेच्या शर्यतीत थेट बाजी मारली आहे. घरातल्या इतर सदस्यांवर धोक्याची घंटा मात्र आहे. आता बिग बॉसने ठरवले आहे की, घरातील प्रत्येक सदस्यांच्या प्रवासाचे भव्य सेलिब्रशन करणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात आतापर्यंत जे घडलं नाही ते यंदा घडत आहे. ग्रँड फिनाले आधी, बिग बॉसच्या घरातील सदस्य घराबाहेर येत फॅन्सच्या उपस्थिती जोरदार ग्रँड सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. यावेळी बिग बॉस सदस्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची झलक दाखवत आहेत. फॅन्सच्या उपस्थितीमुळे सदस्य भावूक झालेले दिसून येत आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये,बिग बॉस म्हणत आहेत, "ही कथा आहे एका जखमी वाघिणीची... अनेकदा मनाने तुटूनसुद्धा, अनेक वार पचवूनसुद्धा शेवटपर्यंत अभेद्य राहिलेल्या जान्हवी किल्लेकरची". बिग बॉस'प्रेमींना आज पाहायला मिळणार जखमी वाघीण जान्हवी किल्लेकरची गोष्ट.
'बिग बॉस मराठी'चा शेवटचा आठवडा सुरू असून ग्रँड सेलिब्रेशनच्या माध्यमातून बिग बॉसने सदस्यांना आणि चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. आजचा भाग कसा असेल याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.