"मी तिला प्रपोज हाणला...", सुरज चव्हाणने सांगितली 'झापुक झुपुक' लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 17:57 IST2024-09-06T17:55:34+5:302024-09-06T17:57:46+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : आजच्या अनसीन अनदेखामध्ये सुरज चव्हाणने त्याची लव्हस्टोरी सांगितली.

Bigg Boss Marathi Season 5 : "I proposed to her...", Suraj Chavan told the love story | "मी तिला प्रपोज हाणला...", सुरज चव्हाणने सांगितली 'झापुक झुपुक' लव्हस्टोरी

"मी तिला प्रपोज हाणला...", सुरज चव्हाणने सांगितली 'झापुक झुपुक' लव्हस्टोरी

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) सुरू होऊन एक महिना उलटला आहे. या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दिवसेंदिवस घरातील खेळ मनोरंजक होत चालला आहे. घरात एकीकडे दोन गट पाहायला मिळत आहे. घरात सदस्य एकमेकांकडे व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान यंदाच्या सीझनमध्ये चर्चेत असलेला स्पर्धक सूरज चव्हाण(Suraj Chavan)ने नुकतेच बिग बॉसच्या घरात त्याची लव्हस्टोरी सांगितली. 

आजच्या अनसीन अनदेखामध्ये सुरज चव्हाणने त्याची लव्हस्टोरी सांगितली. गार्डन एरियात पॅडी, सुरज ,अभिजित, आर्या आणि अंकिता गप्पा मारताना दिसत आहे. सुरज बाकीच्या सदस्यांना त्याच्या मूव्हीच्या शूटिंग दरम्यान झालेली गंमत सांगत आहे. सुरज सांगतो की,"मी एकदा शूटिंग करत असताना मला शूटिंगवेळी एक मुलगी आवडली होती. वाईच्या इथे आम्ही रूम बुक केली आणि आम्ही त्या रूममध्ये राहिलो. मी तिला पाहण्यासाठी सारखा रुमच्या बाहेर येत होतो. ती पण बाहेर येऊन मला पाहात होती. 

''मी तिला म्हणालो, तू माझ्यासाठी लई स्पेशल आहेस''

त्यानंतर पॅडी म्हणाले की, "तुला कसे माहिती की, ती तुला बघून लाइन देत होती?" त्यावर सुरज म्हणाला की, आम्ही फक्त एकमेकांकडे पाहायचो. मग मी तिला सांगितले की, तू मला खूप आवडते. पण हा सीन मधला डायलॉग होता. मला तिला प्रपोझ हाणायचा होता. मला तिच्या हातामध्ये गुलाब दयायचे होते. मी तिला म्हणालो, तू माझ्यासाठी लई स्पेशल आहेस. हे घे स्पेशल चॉकलेट. माझा बच्चा.." त्यावर पॅडी यांनी विचारले की, "तू असे लाडात येऊन बोललास त्यावर तिचे काय उत्तर होते." यावर सुरज म्हणाला, "ती म्हणाली मला दुसरा मुलगा आवडतो. मग माझ्या दिलाचे चूर चूर तुकडे झाले." यावर अंकिता म्हणाली की "तुझ्या दिलाचे किती तुकडे झाले असतील मोजता येणार नाही."  
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 : "I proposed to her...", Suraj Chavan told the love story