Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात नायिका वर्सेस खलनायिका; योगिता आणि जान्हवीमध्ये रंगलाय वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 13:54 IST2024-07-31T13:53:47+5:302024-07-31T13:54:27+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. घरातील सदस्य एकमेकांची काळजी घेण्यासोबत राडेदेखील करत आहेत. आज एकीकडे घरात 'नॉमिनेशनची तोफ' हे पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात नायिका वर्सेस खलनायिका; योगिता आणि जान्हवीमध्ये रंगलाय वाद
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. घरातील सदस्य एकमेकांची काळजी घेण्यासोबत राडेदेखील करत आहेत. आज एकीकडे घरात 'नॉमिनेशनची तोफ' हे पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. पहिल्याच टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये मोठं भांडण झालेले पाहायला मिळणार आहे. दरम्यान 'बिग बॉस मराठी'च्या घरात नायिका वर्सेस खलनायिका म्हणजेच योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात नॉमिनेशनवरुन पहिली वादाची ठिणगी पडली आहे.
पहिल्या टास्कदरम्यान 'बिग बॉस'ने ज्यांच्याकडे स्वत:ची स्टॅटर्जी नाही आणि दुसऱ्यांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात अशा सदस्यांना नॉमिनेट करण्यास सांगितले आहे. दरम्यान योगिता आणि जान्हवी यांच्यात नॉमिनेशनवरुन मोठा वाद रंगलेला पाहायला मिळेल. नॉमिनेशनवरुन जान्हवी म्हणते,"योगिताने मुर्खासारखं कारण न देता नॉमिनेट केलं आहे".
दरम्यान योगिता म्हणते,"जान्हवी मी तुझ्यासारखं मुर्खासारखा हा शब्द वापरलेला नाही. तू तोंडावर वेगळी आहेस आणि मागे वेगळी वागतेस". यावर जान्हवी म्हणते, "पण मला योग्य कारण तर दे". त्यावर योगिता म्हणते,"बिग बॉस'ने सांगितल्यानुसारच मी नॉमिनेट केलं आहे". बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज, रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर पाहायला मिळेल.