निक्की, वैभव, अंकिता की वर्षाताई ? कोण बोलणार 'बिग बॉस मराठी'च्या घराला आज GOODBYE

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 17:44 IST2024-09-15T17:43:17+5:302024-09-15T17:44:25+5:30

र्यानंतर आणखी एक सदस्य घराचा निरोप घेणार आहे. तो सदस्य कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. 

Bigg Boss Marathi Season 5 Eviction Nikki, Vaibhav, Ankita Abhijeet Or Varsha Usgaonkar | निक्की, वैभव, अंकिता की वर्षाताई ? कोण बोलणार 'बिग बॉस मराठी'च्या घराला आज GOODBYE

निक्की, वैभव, अंकिता की वर्षाताई ? कोण बोलणार 'बिग बॉस मराठी'च्या घराला आज GOODBYE

'BIGG BOSS मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) टास्क दरम्यान तुफान राडे होताना दिसतात. या सीझनमध्ये जोरदार वादावादी होत आहेत.  निक्कीच्या  कानशि‍लात लगावल्याने आर्या जाधव घराबाहेर पडली आहे. आता आर्यानंतर आणखी एक सदस्य घराचा निरोप घेणार आहे. तो सदस्य कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. 


'BIGG BOSS मराठी'च्या घरात या आठवड्यात डबल एव्हिकशन होणार आहे. नुकतंच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश घरात असून तो नॉमिनेट होणाऱ्या स्पर्धकाबद्दल बोलताना दिसतोय.  रितेश म्हणतो, आज बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे मला जाहीर करायचं आहे. तुमच्यासमोर येऊन हे जाहीर करणं माझ्यासाठी प्रचंड अवघड आहे. देशातील मराठी प्रेक्षकांनी ठरवलंय.. या आठवड्यात घराबाहेर जाणारा सदस्य ठरवला आहे. त्यामुळे घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे….".


जो सदस्य घराचा निरोप घेणार आहे, त्याबद्दल सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. या आठवड्यात अभिजीत, वर्षा, निक्की, अंकिता आणि वैभव हे नॉमिनेट झाले होते. त्यापैकी वैभव हा बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मराठी मनोरंजनाचा बॉस 'BIGG BOSS मराठी' तुम्ही रात्री 9 वाजता एकाच वेळी JioCinema Premium आणि @colorsmarathi वर पाहू शकता. 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Eviction Nikki, Vaibhav, Ankita Abhijeet Or Varsha Usgaonkar