Bigg Boss Marathi Season 5: एलिमिनेशनमध्ये कोणाला मोदक तर कोणाला मिळणार नारळ! 'हा' सदस्य जाणार घराबाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 17:23 IST2024-09-07T16:54:11+5:302024-09-07T17:23:31+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: कलर्सने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये एलिमिनेशनची झलक पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi season 5 eliminations contestant will get modak or coconut | Bigg Boss Marathi Season 5: एलिमिनेशनमध्ये कोणाला मोदक तर कोणाला मिळणार नारळ! 'हा' सदस्य जाणार घराबाहेर?

Bigg Boss Marathi Season 5: एलिमिनेशनमध्ये कोणाला मोदक तर कोणाला मिळणार नारळ! 'हा' सदस्य जाणार घराबाहेर?

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठी मध्ये आज भाऊचा धक्का रंगणार आहे. रितेश देशमुख निक्की, अरबाज या टीम A मधील गँगला चांगलंच धारेवर धरणार आहे. तसंच या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. निक्की, अरबाज, अभिजीत, धनंजय, सुरज, आर्या आणि घन:श्याम या सदस्यांमधून एक जण घराबाहेर जाणार आहे. तो सदस्य कोण असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. कलर्सने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये एलिमिनेशनची झलक पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठीने नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये रितेश म्हणतो, 'आता होणार आहे एलिमिनेशन. ज्यांना मोदक मिळतील ते सुरक्षित होतील. तसंच ज्यांना नारळ मिळणार तो सदस्य घरातून बाहेर जाणार.' सात जणांमधील कोणता सदस्य बाहेर पडतो याचा उलगडा भाऊच्या धक्क्यावर होणारच आहे. 


गेल्या आठवजड्यात सर्व वोटिंग लाईन्स बंद होते. त्यामुळे कोणीच घराबाहेर गेलं नव्हतं. तर या आठवड्यात एकाला बाहेर जावंच लागणार आहे. तो सदस्य घन:श्याम असल्याचा अनेकांचा अंदाज आहे. या आठवड्यात सुरज चव्हाण कॅप्टन झाला असल्याने तो आपोआपच सुरक्षित होण्याची शक्यता आहे. तसंच दुसरीकडे निक्कीची खरडपट्टी काढल्यानंतर रितेशने तिला शिक्षा सुनावली आहे. तिच्याकडून संपूर्ण सिझनभर कॅप्टन्सीच काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे यावर निक्कीची रिअॅक्शन पाहायला मजा येणार आहे.

Web Title: Bigg Boss Marathi season 5 eliminations contestant will get modak or coconut