अभिजीतला भेटून 'बिग बॉस'च्या घराबाहेर आल्यावर शिल्पानं शेअर केली पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 14:50 IST2024-09-26T14:49:52+5:302024-09-26T14:50:29+5:30

'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व सध्या प्रचंड चर्चेत आहे.​​

Bigg Boss Marathi Family Week​​ Abhijeet Sawant Wife Shilpa First Post After Meeting Husband BB House | अभिजीतला भेटून 'बिग बॉस'च्या घराबाहेर आल्यावर शिल्पानं शेअर केली पोस्ट!

अभिजीतला भेटून 'बिग बॉस'च्या घराबाहेर आल्यावर शिल्पानं शेअर केली पोस्ट!

Bigg Boss Marathi Family Week : 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व सध्या प्रचंड चर्चेत आहे. हे पर्व सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. यंदाचं  पर्व १०० नाही तर ७० दिवसांमध्ये संपणार आहे.  'बिग बॉस' जेव्हा अंतिम टप्प्यात येतं. तेव्हा घरात सदस्यांच्या कुटुंबीयांना बोलवण्यात येत आहे. त्या 'फॅमिली वीक टास्क'ला बिग बॉस मराठीच्या घरात सुरूवात झाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत सावंतची ( Abhijeet Sawant ) पत्नी शिल्पा आणि त्याच्या दोन मुली आहाना आणि स्मिरा यांनी घरात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. अभिजीतची भेट घेऊन घराबाहेर आल्यावर शिल्पाने खास पोस्ट शेअर केली आहे. 

नुकतंच 'कलर्स मराठी'ने एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये पत्नी शिल्पा व दोन मुली आहना आणि स्मिरा यांना  भेटून अभिजीत प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळाली. अभिजीतची भेट घेतल्यानंतर त्याची पत्नी शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहलं, "सर्वात आधी आम्हाला बिग बॉस मराठीमध्ये बोलावल्याबद्दल कलर्स मराठी वाहिनीचे आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार! इतक्या दिवसांनंतर अभिजीतला बघून खूपच छान वाटलं. आम्हाला भेटल्यावर तो आता अजून स्ट्राँगली गेम खेळेल हे नक्की! तो खूप जास्त स्ट्राँग माणूस आहे. आजचा फॅमिली स्पेशल एपिसोड बघायला विसरू नका आणि आपल्या अभिजीतला भरभरून व्होट्स करा!", या शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

'बिग बॉस'मध्ये 'फॅमिली वीक' सुरू झाल्याचं पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आताच्या घडीला अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, पंढरीनाथ, वर्षा, निक्की आणि धनंजय असे एकूण आठ सदस्य आहेत. फिनाले अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे येत्या आठवड्यात हे सगळे सदस्य नॉमिनेट आहेत.  'बिग बॉस मराठी'चा महाअंतिम सोहळा येत्या 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. ग्रँड फिनालेमध्ये कोण मानाची ट्रॉफी  उंचावणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

Web Title: Bigg Boss Marathi Family Week​​ Abhijeet Sawant Wife Shilpa First Post After Meeting Husband BB House