लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त योगिता चव्हाणची पतीसह परदेशवारी; खास पद्धतीने केलं सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:29 IST2025-03-03T12:27:10+5:302025-03-03T12:29:32+5:30
'बिग बॉस' फेम योगिता चव्हाणने खास पद्धतीने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, पतीसह 'या' देशात करतेय भ्रमंती

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त योगिता चव्हाणची पतीसह परदेशवारी; खास पद्धतीने केलं सेलिब्रेशन
Yogita And Saurabh Wedding Anniversary: योगिता चव्हाण हे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय असलेलं नाव आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ती सहभागी झाली होती. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली. कलर्स मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेतील अंतरा-मल्हार जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अभिनेत्री योगिता चव्हाणने मालिकेत अंतराचं पात्र साकारलं तर सौरभ चौघुले मल्हारच्या भूमिकेत दिसला. जीव माझा गुंतलामध्ये काम करत असताना या जोडीचे खऱ्या आयुष्यातही सूर जुळले. गतवर्षी ३ मार्च २०२४ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. दरम्यान, सौरभ-योगिताच्या लग्नाला आता १ वर्ष पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने सौरभ चौघुलेने त्याच्या पत्नीसाठी खास रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे.
सौरभ-योगिता हे कपल लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त परदेशात गेले आहेत. याचे फोटो सौरभने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत पत्नीला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. "सगळ्यासाठी तुझे मनापासून आभार... लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा...", अशी रोमॅंटिक पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे. दरम्यान, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सौरक्ष आणि योगिता इंडोनेशियांमध्ये पोहोचले आहेत. इंडोनेशियामधील बालीमध्ये हे कपल एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याने शेअर केलेल्या या पहिल्या फोटोमध्ये सौरभ योगिताच्या गालावर किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मध्ये दोघांनी सुंदर सेल्फी काढताना पाहायला मिळत आहे. परदेशवारीतील असे खास क्षण अभिनेत्याने शेअर केले आहेत.
सौरभ चौघुलेच्या या खास पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. "लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा", "क्यूट कपल, बेस्ट कपल एव्हर...", अशा प्रकारच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.