व्हॅकेशन मोड ऑन! अभिनेत्री शिवानी सुर्वेची बॉयफ्रेंड अजिंक्यसोबत रोमॅंटिक ट्रिप, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:37 IST2023-05-06T12:34:39+5:302023-05-06T12:37:46+5:30

या व्हिडिओमध्ये ते दोघेही समुद्रकिनारी एन्जॉय करताना दिसतायेत.

Bigg boss marathi fame shivani surve romantic trip with boyfriend ajinkya nanaware | व्हॅकेशन मोड ऑन! अभिनेत्री शिवानी सुर्वेची बॉयफ्रेंड अजिंक्यसोबत रोमॅंटिक ट्रिप, व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हॅकेशन मोड ऑन! अभिनेत्री शिवानी सुर्वेची बॉयफ्रेंड अजिंक्यसोबत रोमॅंटिक ट्रिप, व्हिडीओ होतोय व्हायरल

शिवानी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'देवयानी', 'नव्या', 'एक दिवाना था' अशा अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. मात्र, बिग बॉस मराठीमुळे ती विशेष चर्चेत आली. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि रोकठोक बोलण्याच्या शैलीमुळे ती ओळखली जाते. शिवानी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मात्र या वेळेस ती एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. नुकतीच शिवानी तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अजिंक्य ननावरेसोबत  ट्रीपला गेली होती.

अजिंक्य आणि शिवानी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. नुकतेच दोघे ट्रिपला गेले होते. त्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ते दोघेही समुद्रकिनारी एन्जॉय करताना दिसताहेत. कधी ते एकमेकांचा हात पकडून बाजूबाजूला बसले आहेत तर कधी शिवानी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून पोझ देताना दिसतेय. 

 

शिवानी आणि अजिंक्य  दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेत अजिंक्य आणि शिवानी यांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होत त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत अजिंक्य आणि शिवानी यांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

अजिंक्य ननावरे सध्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अद्वैतची भूमिका साकारतो आहे. अजिंक्यने याआधी 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला', 'सख्या रे', 'गर्ल्स हॉस्टेल' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. 
 

Web Title: Bigg boss marathi fame shivani surve romantic trip with boyfriend ajinkya nanaware