भर मांडवात सगळ्यांसमोरच बायकोला उचलून घेतलं अन्...; लग्नानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "तू आणि मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:24 IST2025-12-26T16:23:42+5:302025-12-26T16:24:10+5:30
जयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये लग्नातील खास क्षण टिपले आहेत. लग्न झाल्यानंतर जयने पत्नी हर्षलाला भर मांडवातच सगळ्यांसमोर उचलून घेतलं. हा खास क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भर मांडवात सगळ्यांसमोरच बायकोला उचलून घेतलं अन्...; लग्नानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "तू आणि मी..."
मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचा माहौल आहे. एका मागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी-सोहम बांदेकर, तेजस्विनी लोणारी यांच्यानंतर बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणे लग्नाच्या बेडीत अडकला. २४ डिसेंबरला जयने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत गर्लफ्रेंड हर्षला पाटील हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर जयने पहिली पोस्ट करत लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
जय दुधाणेने लग्नासाठी खास पारंपरिक लूक केला होता. शेरवानी, फेटामध्ये जय राजबिंडा दिसत होता. तर हर्षलाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. जयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये लग्नातील खास क्षण टिपले आहेत. लग्न झाल्यानंतर जयने पत्नी हर्षलाला भर मांडवातच सगळ्यांसमोर उचलून घेतलं. हा खास क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे फोटो शेअर करत जयने "तू, मी आणि आयुष्यभराचं प्रेम...", असं कॅप्शन दिलं आहे.
जय'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये तो चर्चेतील चेहरा होता. 'बिग बॉस मराठी ३'चा तो उपविजेता होता. तर 'MTV स्प्लिट्सविला १३'चा जय विनर होता. त्यानंतर जय 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतही दिसला होता. जयची पत्नी हर्षला पाटील ही लोकप्रिय सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणूनही ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकाना डेट करत होते.