"मी बिग बॉसमध्ये गेले तर कोणाला तरी मारेन नाहीतर...", स्पष्टच बोलली अमृता खानविलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:59 IST2026-02-19T17:59:13+5:302026-02-19T17:59:41+5:30

बिग बॉसमुळे अनेक कलाकारांचं नशीबही उजळलं आहे. प्रत्येक नव्या सीझनमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी बिग बॉसमध्ये पाहायला मिळतात. अमृता खानविलकरलाही बिग बॉसमध्ये जाण्याबाबत विचारण्यात आलं. 

bigg boss marathi amruta kanvilkar expressed her views on reality show | "मी बिग बॉसमध्ये गेले तर कोणाला तरी मारेन नाहीतर...", स्पष्टच बोलली अमृता खानविलकर

"मी बिग बॉसमध्ये गेले तर कोणाला तरी मारेन नाहीतर...", स्पष्टच बोलली अमृता खानविलकर

Bigg Boss Marathi 6: सध्या बिग बॉस मराठीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये जाण्यासाठी अनेक सेलिब्रिटी उत्सुक असतात. हा एक असा रिएलिटी शो आहे जिथे तुमचं व्यक्तिमत्त्व चाहत्यांना दाखवण्याची संधी मिळते. बिग बॉसमुळे अनेक कलाकारांचं नशीबही उजळलं आहे. प्रत्येक नव्या सीझनमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी बिग बॉसमध्ये पाहायला मिळतात. अमृता खानविलकरलाही बिग बॉसमध्ये जाण्याबाबत विचारण्यात आलं. 

अमृताने काही दिवसांपूर्वीच फिल्मीज्ञानला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला 'बिग बॉस' या शोबद्दल विचारणा झाली. तेव्हा अमृता म्हणाली, "मला घरातून फक्त या शोमध्ये जाण्यासाठी नकार आहे. त्यांना असं वाटतं की मी जर बिग बॉसमध्ये गेले तर एकतर कोणाला तरी मारेन तरी किंवा मार खाऊन तरी येईन. मी तर कोणाकडून मार खाऊन घेणार नाही, हे तर खरं आहे. पण मला हे करायचं नाही. काही गोष्टी या पडद्यामागेच चांगल्या असतात".


दरम्यान, अमृता सध्या तिच्या 'तस्करी' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये अमृताने एका महिला कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. 'तस्करी'मध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी मुख्य भूमिकेत असून अमृताने या सीरिजमध्ये त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित करण्यात आली आहे. 

Web Title : अमृता खानविलकर बिग बॉस पर: 'या तो मैं किसी को मार डालूंगी या...'

Web Summary : अमृता खानविलकर ने बताया कि वह बिग बॉस मराठी में क्यों भाग नहीं लेंगी। उन्हें डर है कि या तो वह लड़ाई करेंगी या पिट जाएंगी। फिलहाल, अमृता इमरान हाशमी के साथ अपनी वेब सीरीज 'तस्करी' का प्रमोशन कर रही हैं, जो नेटफ्लिक्स पर स्ट्रीमिंग हो रही है।

Web Title : Amruta Khanvilkar on Bigg Boss: 'I'll either kill someone or...'

Web Summary : Amruta Khanvilkar revealed why she won't participate in Bigg Boss Marathi. She fears she would either end up fighting or getting beaten. Currently, Amruta is promoting her web series 'Taskari' with Emraan Hashmi, streaming on Netflix.