Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 08:42 IST2025-12-01T08:41:52+5:302025-12-01T08:42:49+5:30
'बिग बॉस मराठी ६'चा होस्ट कोण असणार? महेश मांजरेकर की रितेश देशमुख यांच्यापैकी 'बिग बॉस मराठी ६'चं सूत्र संचालन कोण करणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता 'बिग बॉस मराठी ६'चा होस्ट कोण असणार, याचं उत्तर मिळालं आहे.

Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस १९' हा सीझन आता शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच बिग बॉस हिंदीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यानंतर ज्याची चाहत्यांना आतुरता होती तो 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सुरू होणार आहे. 'बिग बॉस मराठी ६'ची घोषणा झाली असून याचा प्रोमो समोर आला आहे. 'बिग बॉस मराठी ६'चा होस्ट कोण असणार? महेश मांजरेकर की रितेश देशमुख यांच्यापैकी 'बिग बॉस मराठी ६'चं सूत्र संचालन कोण करणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता 'बिग बॉस मराठी ६'चा होस्ट कोण असणार, याचं उत्तर मिळालं आहे.
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन रितेश देशमुख होस्ट करणार आहे. रितेशने बिग बॉस हिंदीच्या वीकेंड का वारमध्ये हजेरी लावली होती. बिग बॉसच्या सेटवरुन रितेशचा व्हिडीओ समोर आला आहे. सलमान खानने रितेशला बिग बॉस मराठी होस्ट करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. "भाऊ तुम्हाला बिग बॉस मराठीसाठी खूप शुभेच्छा... लवकरच याची तारीख सर्वांना समजेल", असं सलमान म्हणाला. याशिवाय कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरुनही रितेशचा व्हिडीओ शेअर करत "रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीझन 6 चे होस्ट म्हणून येणार, अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणार... तुम्ही तयार आहात ना?", असं कॅप्शन देण्यात आलं आहे. त्यामुळे रितेश देशमुखचं बिग बॉस मराठी होस्ट करणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
बिग बॉस मराठीचे पहिले चार सीझन अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. त्यानंतर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला होस्ट बदलण्यात आला. रितेश देशमुखने बिग बॉस मराठी ५ होस्ट केलं होतं. आता बिग बॉस मराठीचा नवा सीझनही रितेशच होस्ट करणार आहे. बिग बॉस मराठी ६मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.