राकेशने प्रेम नाकारताच राखीनं रडत-रडत स्विमिंग पूलमध्ये घेतली उडी, बिग बॉसच्या घरात मोठा ड्रामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:01 IST2026-03-05T13:00:00+5:302026-03-05T13:01:08+5:30

राखी आणि राकेशच्या गोड नात्याला लागलं ग्रहण?

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant Jumps In Pool Heartbreak After Raqesh Bapat Refuses Her Love | राकेशने प्रेम नाकारताच राखीनं रडत-रडत स्विमिंग पूलमध्ये घेतली उडी, बिग बॉसच्या घरात मोठा ड्रामा!

राकेशने प्रेम नाकारताच राखीनं रडत-रडत स्विमिंग पूलमध्ये घेतली उडी, बिग बॉसच्या घरात मोठा ड्रामा!

'ड्रामा क्वीन' राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरात फूल धमाल सुरू आहे. राखी सावंतच्या एन्ट्रीशिवाय बिग बॉसचा कोणताही  सिझन अपूर्ण आहे. राखीचे एपिसोड प्रेक्षक आवर्जून पाहतात. पण सध्या एका कारणामुळे बिग बॉसच्या घरात प्रचंड राडा झाला आहे. राखीचं हार्ट ब्रेक झालं आहे. हृदय तुटताच राखीनं रडत-रडत थेट स्विमिंग पूलमध्ये उडी घेतल्याचं पाहायला मिळालंय.  नुकताच बिग बॉसच्या घरातील नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

राखी आणि राकेशच्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव पाहायला मिळत होता. राकेश आणि तन्वीचा डान्स पाहून राखी इतकी दुखावली होती की तिने रागाच्या भरात स्वतःचे केस कापून घेतले होते. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राकेश राखीची समजूत काढायला येतो, पण तिथेच वादाची ठिणगी पडते.

राकेशने राखीला स्पष्ट सांगितलं की, "आपण फक्त मित्र आहोत". यावर राखीने विचारलं, "म्हणजे आता आपण फक्त मित्रच राहणार का?" त्यावर राकेशने "मला कोणालाही हर्ट करायचं नाहीये" असं म्हणत तिथून काढता पाय घेतला. राकेशचं हे वागणं राखी दुखावली आणि "I Am Loser" असं म्हणत रडत-रडत स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. तिची ही कृती पाहून घरातील इतर सदस्य थक्क झाले आणि तिला बाहेर काढण्यासाठी धावले. 


राखीच्या या ड्राम्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. "हा शो बिग बॉस कमी आणि 'लव्ह बॉस' जास्त वाटतोय,"अशी कमेंट एकाने केली. "राखीची ही सगळी नाटकं आहेत, राकेशच्या बाजूने कधीच काही नव्हतं", असंही अनेकांचं म्हणणं आहे. तर काहींनी हा सगळा प्रकार 'फेक' असल्याचं म्हटलं आहे. आता या पूल ड्राम्यानंतर राखी आणि राकेशच्या मैत्रीत आता कायमचा दुरावा येणार का? हे पाहणं रंजक ठरेल.

Web Title : राकेश के प्रेम को ठुकराने पर राखी ने पूल में लगाई छलांग!

Web Summary : बिग बॉस में ड्रामा! राकेश के दोस्ती कहने पर राखी का दिल टूटा और वह पूल में कूद गई। घरवालों ने उसे बचाया। दर्शकों ने शो को 'लव बॉस' कहा।

Web Title : Rakhi jumps into pool after Rakesh rejects her love!

Web Summary : Drama unfolds in Bigg Boss as Rakhi jumps into the pool heartbroken after Rakesh clarifies they are just friends. Other housemates rush to her aid. Viewers react, calling the show 'Love Boss'.