"राकेशला आता सपोर्टची गरज नाही, कारण...", राकेश बापटची Ex पत्नी रिद्धी डोग्राने थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:40 IST2026-03-11T12:40:18+5:302026-03-11T12:40:45+5:30

राकेशची एक्स पत्नी रिद्धी डोगराने त्याला पाठिंबा दिला आहे. रिद्धीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये राकेशसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

bigg boss marathi 6 rakesh bapat ex wife riddhi dogra supports him shared video | "राकेशला आता सपोर्टची गरज नाही, कारण...", राकेश बापटची Ex पत्नी रिद्धी डोग्राने थेटच सांगितलं

"राकेशला आता सपोर्टची गरज नाही, कारण...", राकेश बापटची Ex पत्नी रिद्धी डोग्राने थेटच सांगितलं

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या घरात राकेश बापटला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. पहिल्या दिवसापासून तो घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. टास्कमध्येही त्याचा गेम प्लॅन दिसून येत आहे. राकेश बापट हा 'बिग बॉस'च्या घरातील स्ट्राँग स्पर्धक मानला जात आहे. चाहत्यांनीही त्याला टॉप ५ मध्ये बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता राकेशची एक्स पत्नी रिद्धी डोगराने त्याला पाठिंबा दिला आहे. रिद्धीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये राकेशसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

"राकेश बापटचा मला अभिमान आहे. तो खूप चांगलं खेळतोय. तो पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार असल्याने आम्ही सगळेच चिंतेत होतो. पण यावेळी तो मस्त खेळतोय. तो जसा आहे तसाच घरातही दिसतोय. याच राकेशला आम्ही ओळखतो. तो त्याच्या त्याच्या पद्धतीने हा गेम खेळत आहे. तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तुला चिअर अप करतेय. पण यावेळी तुला पाठिंब्याची गरज नाही. पण तरीही नेहमीच तुला माझा पाठिंबा राहील", असं म्हणत रिद्धीने राकेशला पाठिंबा दिला आहे. 


दरम्यान, बिग बॉसच्या घरातही राकेश त्याची एक्स पत्नी रिद्धीबद्दल बोलला होता. वेगळे झाल्यानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत, असं राकेशने सांगितलं होतं. राकेश बापट आणि रिद्धी डोग्रा यांनी २०११ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. लग्नानंतर ८ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. २०१९ मध्ये ते वेगळे झाले. मात्र त्यांची मैत्री अजूनही कायम आहे. 

Web Title : राकेश बापट को अब समर्थन की ज़रूरत नहीं: पूर्व पत्नी रिद्धि डोगरा

Web Summary : रिद्धि डोगरा ने बिग बॉस मराठी 6 में राकेश बापट का समर्थन किया। उन्हें उनके खेल पर गर्व है और वे जैसे हैं वैसे ही दिख रहे हैं। तलाक के बावजूद, वे दोस्त बने हुए हैं, रिद्धि हमेशा उनका समर्थन करती हैं।

Web Title : Raqesh Bapat Doesn't Need Support Now: Ex-Wife Riddhi Dogra

Web Summary : Riddhi Dogra supports Raqesh Bapat in Bigg Boss Marathi 6. She's proud of his game and how he's being himself. Although divorced, they remain friends, with Riddhi always supporting him.